युथ फॉर मुंबई – मुंबई पोलीस, परिमंडळ 4 कडून स्पर्धा संपन्न
युथ फॉर मुंबई - मुंबई पोलीस, परिमंडळ 4 कडून स्पर्धा संपन्न
भारत देश हा तरुणांचा देश म्हणून ओळखला जातो. देशाचे युवा-तरुण हे देशाच्या विकासाचे पायाभूत घटक आहेत. आज मुंबईच्या विविध शाळांमध्ये तसेच महाविद्यालयामध्ये शिक्षण घेणारा विद्यार्थी हा सन २०३० मध्ये मुंबईमधील सामान्य नागरीक, प्रशासकीय अधिकारी तसेच राजकारणामध्ये सक्रिय सहभाग घेतलेला नेता असणार आहे. म्हणुन तरुणांचा सन २०३० मधील आदर्श मुंबई शहरासाठी दृष्टीकोन कसा असेल हे जाणून घेण्यासाठी मा. पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई यांचे संकल्पनेने दिनांक ३०/०५/२०२२ रोजी “Youth for Mumbai” Speaker Forum या कार्यक्रमाचे एनसीपीए सभागृह, नरीमन पॉईट, मुंबई येथे आयोजन केले आहे.
यासाठी परिमंडळ स्तरावर शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकरिता स्पर्धा आयोजित करण्यात येत आहेत. यासाठी
परिमंडळ ४, बृहन्मुंबई पोलीस यांच्या तर्फे सायन येथील गोकुळ हॉलचे सरस्वती ऑडोटोरियम येथे स्पर्धकांनी मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेच्या माध्यमातून भाषण स्पर्धा घेवून निवड करण्यात आली.
यावेळी पोलीस उप आयुक्त श्री संजय पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना सांगितले की, ‘या केवळ स्पर्धा नसून भविष्याचा वेध घेण्याची क्षमता निर्माण करणारी ही गोष्ट आहे.’
यावेळी परीक्षक म्हणून लेखन आणि संपादनाचा अनुभव असणारे एच एस चीमा, व अनेक वर्षे क्लासेसचा अनुभव असणारे श्री संजय थरियानी यांनी व स्वतः पोलीस उप आयुक्त श्री संजय पाटील यांनी परीक्षक म्हणून भूमिका बजावली.
सदरचा कार्यक्रम परिमंडळ ४, मुंबईचे पोलीस उप आयुक्त श्री संजय पाटील यांचे मार्गदर्शनात व देखरेखीत यशस्वीरित्या पूर्ण झाला. परिमंडळ ४ मधील विविध १६ शाळा व महाविद्यालयांच्या संघातून स्पर्धा घेवून चमुची २ निवड केली आहे. यामध्ये शालेय गटातून डॉ. शिरोडकर हायस्कूल, परेल, मुंबई यांचा चमू आणि महवियालयीन गटातून रुईया कॉलेज, माटुंगा, मुंबई यांच्या चामूची निवड करण्यात आलेली आहे.
बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालयातील ०५ प्रादेशिक विभागामधून प्रत्येकी २ संघ असे एकूण १० संघ, ३ विद्यार्थ्यांचा १ संघ असे एकुण ३० विद्यार्थी दिनांक ३०/०५/२०२२ रोजी प्रत्येक विद्यार्थी ०३ मिनीटांमध्ये सन २०३० मध्ये तो सामान्य नागरीक, प्रशासकीय अधिकारी किंवा राजकारणातील राजकीय नेता असल्यास कशा प्रकारे मुंबईला आदर्श शहर बनविण्याचा प्रयत्न करील, याबाबत आपले विचार मांडेल. सदर स्पर्धकांमधुन निवडलेल्या विजयी विद्यार्थ्याचा गौरव करण्यात येईल.