औरंगाबादक्राईममहाराष्ट्र
पडेगावात एटीएम फोडून चोरट्यांनी 8 लाख रुपये केले लंपास
पडेगावात एटीएम फोडून चोरट्यांनी 8 लाख रुपये केले लंपास
औरंगाबाद शहरातील पडेगाव भागातील एका खाजगी कंपनीचे एटीएम फोडून चोरट्यांनी 8 लाख 11 हजार 100 रुपये रोकड लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आलाय. विशेष म्हणजे हे एटीएम जळालेल्या अवस्थेत आढळले आहे. चोरीच्या वेळी एटीएम मध्ये 100 रुपयांच्या 4 नोटा, 200 रुपयांच्या 10 नोटा, 500 रुपयांच्या एक हजार 595 नोटा आणि दोन हजार रुपयांच्या सहा नोटा होत्या असं अहवालातून समोर आलंय.