मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या कंपनीच्या नावाचा वापर करून बनावट दारूचा सुरू असलेला धुळ्यातील कारखाना पोलिसांनी केला उध्वस्त
मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या कंपनीच्या नावाचा वापर करून बनावट दारूचा सुरू असलेला धुळ्यातील कारखाना पोलिसांनी केला उध्वस्त
धुळे तालुका पोलिसांनी ट्रक क्रमांक MH 41 AU 2124 यामध्ये अवैधरित्या दारूची वाहतूक केली जात आहे सदर वाहन हे फागणे ते बाभुळवाडी रस्त्याने जाणार आहे. अशी गोपनीय माहिती धुळे तालुका पोलिसांना मिळाली त्यावरून तालुका पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांनी सापळा रचत सदर वाहन अडवण्यात आले व त्यातील एक इसम सोपान रवींद्र परदेशी राहणार शिरुड यास ताब्यात घेतले. त्या ट्रकमध्ये देशी दारू संत्रा नावाचे एकूण शंभर बॉक्स आढळून आले. त्यानुसार तालुका पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. हा माल कोठून आणला यासंदर्भात पोलिसांनी विचारपूस केली असता, त्यांनी कावठी शिवारात बनावट दारू कारखान्याविषयी माहिती दिली त्या अनुषंगाने सोनगीर पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या कावठी शिवारात जाऊन धुळे तालुका आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धाड टाकून सदरचा कारखाना उध्वस्त केला. गुजरात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धुळे तालुका पोलीस तसेच धुळे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागा कडून बनावट दारू बनविण्याचा मिनी कारखाना उद्ध्वस्त करण्यात आला आहे. आणि विशेष म्हणजे राज्याचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रवरा डिस्टिलरी कंपनीचा वापर करून बनावट दारूचा सुरू असलेला धुळ्यातील कारखाना पोलिसांनी उध्वस्त केला आहे.गुजरात निवडणुकी बरोबरच धुळ्यात देखील 128 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांची रणधुमाळी सध्या सुरू आहे. यातच धुळे तालुक्यातील कावठी शिवारामध्ये सर्रासपणे बनावट दारूचा कारखाना सुरू असल्याची माहिती धुळे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग व धुळे तालुका पोलिसांना मिळाली होती या माहितीच्या अनुषंगाने काल रात्रीच्या सुमारास पोलिसांनी हा बनावट दारूचा मिनी कारखाना उध्वस्त केला आहे. या कारवाईदरम्यान पोलिसांनी जवळपास एक कोटी रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे, तसेच महत्त्वाचे म्हणजे या कारवाईतील मुख्य आरोपी तेथील कावठी गावातील सरपंच महिलेचा पती असल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे सरपंच महिलेच्या पतीकडूनच हा बनावट दारूचा कारखाना सुरू होता. पोलिसांनी या कारवाईदरम्यान दहा जणांवर गुन्हा दाखल केला आहे. त्यापैकी सात जणांच्या मुस्क्या पोलिसांनी आवळले असून यातील तिघा आरोपी सध्या फरार आहेत. फरार आरोपींचा तपास आता पोलीस करीत असल्याची माहिती पोलीस अधीक्षक संजय बारकुंड यांनी दिली आहे.