बातम्यामहाराष्ट्र
Trending

सामाजिक कार्यकर्त्यांसह पथकाने बालमजूरांची वाहतूक होत असलेल्या दोन वाहनांना घेतले ताब्यात

सामाजिक कार्यकर्त्यांसह पथकाने बालमजूरांची वाहतूक होत असलेल्या दोन वाहनांना घेतले ताब्यात

सामाजिक कार्यकर्त्यांसह पथकाने बालमजूरांची वाहतूक होत असलेल्या दोन पिकअप वाहनांना ताब्यात घेऊन पोलीस स्टेशन येथे जमा करण्यात आले आहे. यावेळी एक पिकअप वाहन पळून गेले. शहादा शिरपूर रस्त्यावरील वाघाडी येथे सकाळी 8:30 वाजेच्या दरम्यान सापळा रचून पथकाने मजूर वाहतूक करणाऱ्या दोन पिकअप वाहन ताब्यात घेतले. यावेळी दोन वाहनातून 30 पेक्षा जास्त बालमजूर असल्याचे सामाजिक कार्यकर्ते चंद्रकात येशीराव यांनी सांगितले. मात्र बालमजूरांवरील करवाई वरुन सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत येशीराव व बालकामगार अधिकारी यांच्यात मतभेद दिसून आले. काम करतांना आढळल्याशिवाय कारवाई करता येणार नसल्याचे बालकामगार अधिकारी यांच्याकडून सांगण्यात येत असल्याचे सामाजिक कार्यकर्ते येशीराव यांनी सांगितले. यावेळी बालकामगार विभागाकडून शिरपूर शहर पोलीस स्टेशनात उशीरापर्यंत कारवाई सुरु होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button