गिरीश महाजन यांच्या आरोपानंतर एकनाथ खडसे त्यांचे कुटुंबीय भावनिक
गिरीश महाजन यांच्या आरोपानंतर एकनाथ खडसे त्यांचे कुटुंबीय भावनिक
एकनाथ खडसे व गिरीश महाजन यांच्या सुरू असलेल्या आरोप प्रत्यारोपावरून गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसे यांच्या मुलाने आत्महत्या केली की त्याचा खून झाला याची चौकशी व्हायला पाहिजे असे वक्तव्य केले होते दरम्यान या वक्तव्यामुळे एकनाथ खडसे व त्यांचे कुटुंबीय भावनिक झाले असून या आरोपामुळे माझ्या परिवाराला अत्यंत वेदना झाल्याचे म्हणत याबाबत प्रतिक्रिया देताना एकनाथ खडसे भावनिक झाल्याचे पाहायला मिळाले.
दरम्यान अत्यंत नीच व हलकट प्रवृत्तीने गिरीश महादरांनी अशा स्वरूपाचे प्रश्न उपस्थित केले असून माझ्या मुलाने आत्महत्या केली त्यावेळी मी इथे नव्हतो मग गिरीश महाजन यांना रक्षाबंधन संशय आहे का असा सवाल देखील एकनाथ खडसेंनी उपस्थित करत आमच्या परिवारावर संशय घेण्याचा प्रयत्न गिरीश महाजन यांनी केला असल्याचे म्हंटले आहे. तर गिरीश महाजन यांना सत्तेचा माज व सत्तेची मस्ती असून जनता मात्र ही मस्ती उतरल्याशिवाय राहणार नाही अशी टीकाही एकनाथ खडसेंनी केली आहे.
एकनाथ खडसे यांच्या मुलाच्या मृत्यूबाबत अनेक वर्षानंतर गिरीश महाजन यांनी या प्रकरणी आरोप केला आहे मात्र या मागचे कारण गिरीश महाजन यांनाच माहिती असून गिरीश महाजन यांनी केलेले कृत्य मात्र मी उघड्या डोळ्यांनी पाहिले आहे , गिरीश महाजन यांचे अनेक लोकांशी प्रेम संबंध आहे मात्र याचा कधी उल्लेख मी केला नाही कदाचित प्रेमाचे संबंध असू शकतात असा टोला लगावत एकनाथ खडसे यांनी गिरीश महाजन वर निशाणा साधला आहे.
नाहीतरी तुम्ही नाथाभाऊच्या चौकशी करून थकले त्यामुळे कोणत्याही यंत्रणेच्या माध्यमातून माझ्या मुलाच्या मृत्यूची चौकशी करा अशी असा थेट इशारा एकनाथ खडसेंनी गिरीश महाजन यांना दिला आहे.
धडकन महाराष्ट्रातला नेतृत्व संपण्याचा हा प्रकार असून मी त्यांना अडचणीचा ठरतो म्हणून अशा प्रकारे गिरीश महाजन उपद्व्याप करत असल्याचे एकनाथ खडसे म्हणाले.