बातम्यामहाराष्ट्र
बँकांनी शेतकऱ्यांच्या खात्याला जर होल्ड केला तर मॅनेजरचे कपडे काढून ठोकू – रविकांत तुपकर
बँकांनी शेतकऱ्यांच्या खात्याला जर होल्ड केला तर मॅनेजरचे कपडे काढून ठोकू - रविकांत तुपकर
नॅशनल लाईज बँका मस्ती करत आहे. माजलेले अधिकारी आहेत, त्यांना हा अधिकार नाही. ते आमचे अनुदानाचे पैसे आहेत. परस्पर कर्ज खात्यात अनुदान वळती करण्याचा अधिकार तुम्हाला नाही. म्हणून बँकांनी फार मस्ती करू नये. कर्ज हा वेगळा विषय आहे तर अनुदान आणि मिळालेले पैसे वेगळे आहेत. मुळामध्ये राज्य सरकारने केंद्र सरकारशी बोललं पाहिजे आणि रिझर्व्ह बँकेशी बोलून तातडीचा निर्णय घेतला पाहिजे. जर बँकांनी शेतकऱ्यांच्या अनुदानाच्या रूपात मिळालेल्या पैशाला होल्ड केला तर बँक मॅनेजरचे कपडे फाडून ठोकल्याशिवाय राहणार नाही. अशी प्रतिक्रिया स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी आज बुलढाणा येथे शेतकऱ्यांच्या संदर्भात विचारलेल्या प्रश्नावर दिली आहे.