बच्चू कडू यांच्या विरोधात तृतीयपंथी समुदाय आक्रमक; बच्चू कडू यांच्या पोस्टरला शमिभा पाटील यांच्या नेतृत्वाखाली जोडोमारो आंदोलन
बच्चू कडू यांच्या विरोधात तृतीयपंथी समुदाय आक्रमक; बच्चू कडू यांच्या पोस्टरला शमिभा पाटील यांच्या नेतृत्वाखाली जोडोमारो आंदोलन
बच्चू कडू आणि रवी राणा यांच्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या वादा दरम्यान बच्चू कडू यांनी राणा यांच्यावर हिजडा या शब्दाचा वापर केला होता. यामुळे धुळ्यातील तृतीयपंथी आक्रमक झाल्याचे बघावयास मिळाले आहे. बच्चू कडू यांच्या विरोधात तृतीय पंथीयांनी शमीभा पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज बच्चू कडू यांच्या प्रतिमेस जोडे मारून आंदोलन केले.रवी राणा यांनी माझ्यावरील आरोप सिद्ध करावेत हे आरोप सिद्ध झाल्यास त्यांच्या घरी जाऊन मी भांडी घासेल, सिद्ध न झाल्यास मी त्यांना हिजडा समजेल अशा प्रकारचे वादग्रस्त वक्तव्य बच्चू कडू यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी रवी राणा यांच्या विरोधात बोलताना केले होते. बच्चू कडू यांच्या वक्तव्याचा धुळ्यातील तृतीयपंथीयांनी एकत्र येत शमीभा पाटील यांच्या नेतृत्वाखाली निषेध व्यक्त करीत त्यांच्या प्रतीकात्मक फोटोला जोडे मारो आंदोलन केले.धुळे जिल्हाधिकारी कार्यालयात हे आंदोलन करण्यात आले असून, बच्चू कडू यांनी तृतीयपंथीयांची माफी मागावी तसेच त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी करत मंत्रिमंडळ विस्तारात बच्चू कडू यांना मंत्रीपद देण्यात आले तर मुख्यमंत्र्यांच्या दालना बाहेर टाळ्या पिटून आंदोलन करण्याचा इशारा वंचित बहुजन आघाडीच्या निरीक्षक शमीभा पाटील यांनी दिला आहे.
BYTE : शमिभा पाटील