नाशिक जिल्ह्यातील कांदा लिलाव पूर्ववत सुरू
नाशिक जिल्ह्यातील कांदा लिलाव पूर्ववत सुरू
दिवाळी आणि साप्ताहिक सुट्ट्या निमित्त गेल्या दहा दिवसांपासून बंद असलेले कांद्याचे लिलाव लासलगावसह नाशिक जिल्ह्यातील पंधरा बाजार समितीमध्ये आजपासून पूर्ववत सुरू होताच कांद्याच्या बाजारभाव साडेसातशे रुपयांची मोठी वाढ झाल्याने कांद्याचे प्रति क्विंटल कमाल बाजारभाव 3 हजार रुपयांच्या वर गेल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधानाची वातावरण दिसत आहे.लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती आज सकाळच्या सत्रात 500 वाहनातून नऊ हजार क्विंटल कांद्याची आवक झाली आहे या कांद्याला कमाल 3100 रुपये, किमान 1000 रुपये तर सर्वसाधारण 2500 रुपये प्रतिक्विंटनला बाजार भाव मिळाला आहे गेल्या आठवड्यात कांद्याला कमाल 2350 रुपये , किमान 600 रुपये तर सर्वसाधारण 1860 रुपये प्रतिक्विंटनला बाजार भाव मिळाला होता.
BYTE : सुवर्णा जगताप (सभापती ,लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती)