बातम्यामहाराष्ट्रमुंबई

३० हजार रुपये आणि मोबाईल लंपास करण्याऱ्या चोरट्याला ‘राजा’ ने केले सुरक्षारक्षकाच्या हवाली

३० हजार रुपये आणि मोबाईल लंपास करण्याऱ्या चोरट्याला 'राजा' ने केले सुरक्षारक्षकाच्या हवाली

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती मधील फळ मार्केट मध्ये राजा नावाच्या श्वानाने केलेल्या कामगिरीची चर्चा सध्या नवी मुंबईत रंगते आहे. मध्यरात्री सुरु होणाऱ्या भाजी मार्केट मधील शौचालयातून फळ मार्केटमध्ये प्रवेश करून एका व्यापाऱ्याचे 30 हजार रोख आणि मोबाईल फोन लंपास करून पळ काढणाऱ्या तिघा चोरट्यापैकी एका चोरट्याला फळ मार्केट मधील राजा नावाच्या श्वानाने पकडून सुरक्षारक्षकाच्या हवाली केले. हा रस्त्यावरील सामान्य श्वान असला तरी सध्या एपीएमसी फळ बाजारात सुरक्षा रक्षकांचीच भूमिका बजावत असल्याने या श्वानाचे सर्वत्र कौतुक होत आहे. तर एक श्वान सुरक्षा रक्षकाची भूमिका बजावत असताना बाजारपेठेतील सुरक्षारक्षक काय करतात असा प्रश्न व्यापाऱ्यांकडून उपस्थित करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button