नाशिक –
पुढील वर्षापासून पुस्तकांसोबत वह्या देखील मोफत मिळणार असल्याचे वक्तव्य शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सिन्नर तालुक्यातील मिरगाव येथे कॅप्टन अशोककुमार खरात यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते यावेळी राष्ट्रवादीच्या रूपाली चाकणकर देखील उपस्थित होत्या.
सिन्नर तालुक्यातील मिरगाव येथील शिवनिका संस्थांचे अध्यक्ष ब्रम्हांडशास्त्रज्ञ कॅप्टन अशोककुमार खरात यांच्या वाढदिवसानिमित्त शिक्षण मंत्री दीपक केसरकर हे आले होते. यावेळी त्यांनी आपल्या भाषणात बोलताना सांगितले की पुढील वर्षापासून पुस्तकांसोबत वह्या देखील मोफत मिळणार आहे.
– दीपक केसरकर, शिक्षण मंत्री
शिवनिका संस्थांच्या परिसरामध्ये पाणी प्रश्न आणि अन्य विविध समस्या असून आपण याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी कार्यक्रम प्रसंगी उपस्थित असलेल्या राष्ट्रवादीच्या रूपाली चाकणकर यांनी शिक्षण मंत्र्यांकडे केली आहे