बातम्यामहाराष्ट्र
Trending
अमरावतीत 100 रुपयात रवा, डाळ, साखर, तेल शिधा रेशन दुकानात पोहोचलाच नाही
अमरावतीत 100 रुपयात रवा, डाळ, साखर, तेल शिधा रेशन दुकानात पोहोचलाच नाही
गोरगरीब कुटुंबांची दिवाळी गोड करण्यासाठी राज्य सरकारने केवळ शंभर रुपयांमध्ये एक लिटर पामतेल आणि प्रत्येकी एक-एक किलो साखर, रवा, चणाडाळ या चार वस्तूंचे किट देण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु, दिवाळी अगदी तोंडावर आली तरी अद्याप अमरावती जिल्ह्यातील एकाही रेशन दुकानातून या किटचे वाटप सुरू झालेले नाही. रेशन दुकानात 100 रुपयात एक किलो रवा, चणाडाळ, साखर आणि तेल देण्याची सरकारची योजना आहे. पण दिवाळी तोंडावर आलेली असताना हा माल रेशन दुकानावर आलेला नसल्याने कार्ड धारकांची नाराजी व्यक्त होत आहे तर थम मशीन चालत नसल्याने रेग्युलर रेशन ही मिळत नसल्याने गोरगरिबांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.