नवी मुंबई आयुक्तालयातील शासकीय वाहनांना इंडियन ऑइल कंपनीचे इंधन वितरक आशिष सर्विस,खारघर हे उधारीवर इंधन देतात.पोलीस उपनिरीक्षक रमेश गांगुर्डे यांना वाहनांच्या इंधनावर खर्च झालेल्या रजिस्टरमध्ये नोंदणी भरण्याचे काम करत असताना ऑगस्ट महिन्यात आशिष सर्विस, खारघर या पेट्रोल पंपाकडून इंधन बिलाच्या बनावट पावत्या मिळून आल्या.त्या बिलांचा लेखी रिपोर्ट तयार केल्यानंतर प्राथमिक चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले.आशिष सर्विस पेट्रोल पंपवर काम करणारे कर्मचारी व पोशि संतोष म्हात्रे यांनी संगनमत करून जे कामावर हजर असतील त्यांच्याकडे पावती जमा करून ते त्यांच्या हिश्याचे एक लिटर इंधनाचे 20 ते 25 टक्के प्रमाणे पैसे कापून बाकीचे पैसे संतोष म्हात्रे यांना देत असत. तसेच पंपाचे मालक,मॅनेजर व सुपरवायझर यांनी 2021 मध्ये पावत्यांची बिले सादर केली. ते पैसे त्यांच्या बँक खात्यात जमा झाले आहेत. तरीसुद्धा त्यांनी एक फेब्रुवारी ते 15 जुलैपर्यंतच्या कालावधीत बनावट इंधन पावतीचे एकूण सात हजार 74 लिटर ईधनाचे 6 लाख 83 हजार 14 रुपयांची बनावट बिले तयार करून नवी मुंबई पोलीस आयुक्त कार्यालयाकडे मंजुरी करता पाठवली. हा प्रकर उघड झाल्यानंतर पोलीस शिपाई संतोष म्हात्रे यांच्यासह पेट्रोल पंपाचे कामगार, मालक, मॅनेजर व सुपरवायझर यांनी शासनाची फसवणूक केली. त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
BYTE : मिलिंद वाघमारे सहायक पोलिस आयुक्त