बातम्यामहाराष्ट्र

यवतमाळ – नापिकी व कर्जबाजारीपणामुळे गळफास घेऊन शेतकर्‍याची आत्महत्या; यवतमाळ जिल्ह्यातील माळेगाव येथील घटना

यवतमाळ - नापिकी व कर्जबाजारीपणामुळे गळफास घेऊन शेतकर्‍याची आत्महत्या; यवतमाळ जिल्ह्यातील माळेगाव येथील घटना

दिवाळी तोंडावर असताना नापिकी व कर्जबाजारीपणामुळे शेतकर्‍याने घरामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी तालुका येथील माळेगाव येथे घडली. प्रेम धनु पवार (वय 35, रा. माळेगाव), असे मृताचे नाव आहे. त्याच्याकडे साडेतीन एकर शेत असून, बँक ऑफ महाराष्ट्र सह खासगी बँकेचे कर्ज होते. दुबार-तिबार पेरणी केली. मात्र, अतिवृष्टीच्या पावसाने शेतातील पिकांची माती झाली. दिवाळीच्या तोंडावर खिशात दमडीही येण्याची शाश्‍वती नसल्याने आज मंगळवारी पहाटेच्या सुमारास गळफास लावून शेतकऱ्यांनी आत्महत्या केले. ही घटना लक्षात येताच परिसरात एकच खळबळ उडाली मृत शेतकर्‍याच्या पश्‍चात पत्नी चार मुले वृद्घ आई, वडिल, भावंड, असा आप्त परिवार आहे.

बाईट – देविदास पवार (मृतकाचा भाऊ)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button