गडचिरोली – पुलाचे कठडे तोडून स्कॉर्पिओ पडली नदीत; चालक ठार
गडचिरोली - पुलाचे कठडे तोडून स्कॉर्पिओ पडली नदीत; चालक ठार
चंद्रपूरवरून आष्टीकडे भरधाव वेगाने येणारी स्कॉर्पिओ गाडी एमएच २० डिव्ही ३७११ चालकाचे नियंत्रण सुटल्याने पुलावरील कठडे तोडून नदीपात्रात कोसळली. यामध्ये चालकाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना सोमवारी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास घडली. चालकाचा मृतदेह आणि वाहन बाहेर काढण्यात यश आले.सध्या वैनगंगा नदीला पाणी भरपूर आहे. कठडे तोडून हे वाहन पाण्यात कोसळल्यानंतर ते पाण्यात पूर्णपणेबुडाले होते. ही नदी चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्याची सीमा असल्यामुळे घटनास्थळी आष्टी आणि गोंडपिपरी अशा दोन्ही दोन्ही पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पोहोचले होते.दोन तास वाहतूक ठप्प गाडीची काच फोडून चालकाचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. मात्र, रात्री उशिरापर्यंत त्याची ओळख पटलेली नव्हती. मृतदेह रुग्णवाहिकेने गोंडपिपरी येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला. ही घटना गोंडपिपरी पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली. त्यामुळे पुढील तपास गोंडपिपरी पोलीस करीत आहेत. घटनास्थळी गोंडपिपरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी, ठाणेदार, आष्टीचे पोलीस निरीक्षक कुंदन गावडे यांच्यासह पोलीस ताफा होता. या घटनेनंतर दोन्ही बाजूला ट्रकची रांग लागलेली होती. जवळपास दोन तास वाहतूक टप्प होती.