बातम्याबीडमहाराष्ट्र
Trending
बीड – आष्टी तालुक्यात परतीच्या पावसाने खरीप पिकांचे प्रचंड नुकसान; रस्त्यावर नदीजन्य परिस्थिती
बीड - आष्टी तालुक्यात परतीच्या पावसाने खरीप पिकांचे प्रचंड नुकसान; रस्त्यावर नदीजन्य परिस्थिती
बीडच्या आष्टी तालुक्यात परतीच्या पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. बीड/अहमदनगर मार्गावर नदीजन्य परिस्थिती निर्माण झालीय. तर आष्टी तालुक्यातील पांढरी येथे ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने खरीप पिकांचं मोठं नुकसान झालंय. या पावसाने पांढरवाडी गावात शेकडो एकर शेती खरडून गेलीय. काढणीला आलेले पीक पावसाने उध्वस्त झाली आहेत. सकाळपासून आष्टी तालुक्यात पावसाची जोरदार बॅटिंग सुरू असून शेतकरी चिंतेत सापडले आहेत. नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करून भरपाई देण्याची मागणी शेतकरी करतायत. सुरुवातीला पावसाने मोठी ओढ दिली होती. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडले होते. आता अतिवृष्टीने जोमात आलेली पिकं उध्वस्त होत असल्याचं पाहून शेतकरी दुहेरी संकटात सापडले आहे.
बाईट : ग्रामस्थ