Uncategorizedमहाराष्ट्रमुंबई
Trending
मुंबई पोलीस आयुक्त यांचा गृहनिर्माण संस्थाना कायदा हातात न घेण्याचा सल्ला.
मुंबईतील गृहनिर्माण सोसायटयांच्या नाहक त्रासाला वचक बसणार.
मुंबई२६ ; मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी आज फेसबुक लाईव्ह करत मुंबईतील गृहनिर्माण सोसायट्यांनी कायदा हातात न घेण्याचा सल्ला दिला जर अशी कोणतीही तक्रार प्राप्त झाली तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल अशी सूचना वजा ईशारा त्यानी दिला. मुंबई पोलीस आयुक्त यांनी कारभार हातात घेतला तेव्हा मुंबईतील ट्राफिक समस्या बाबाबत एक मोबाईल क्रमांक त्यानी दिला होता त्यावर अनेक प्रकारच्या तक्रारी तर आल्याचं परंतु त्याच बरोबर अनेक सोसायट्या मधील पदाधिकारी देत असलेल्या त्रासाबाबत तसेच काही वरिष्ठ नागरिकांना होत असलेल्या त्रासाबाबत त्यांना तक्रारी प्राप्त झाल्या.