कामगार आयुक्त, कुर्ला एल वॉर्ड आणि पनवेल येथे साजरा करण्यात आला माहिती अधिकार दिन
कामगार आयुक्त, कुर्ला एल वॉर्ड आणि पनवेल येथे साजरा करण्यात आला माहिती अधिकार दिन
श्रीश उपाध्याय/मुंबई
—————————-
माहिती अधिकार दिन महाराष्ट्रात साजरा करण्यात आला. या दिनांचे महत्व सांगताना आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी प्रतिपादन केले की जास्तीत जास्त नागरिकांनी आरटीआय कायदाचा वापर करणे आवश्यक आहे तर शासकीय यंत्रणेनी त्याच प्रमाणात नागरिकांना सहकार्य करण्याची आवश्यकता आहे. आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी वांद्रे येथील कामगार आयुक्त भवन, कुर्ला एल वॉर्ड आणि पनवेल येथील काँग्रेस भवन येथे वेगवेगळया सत्रात आयोजित व्याख्यानात भाग घेतला.
आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी प्रतिपादन केले की लोकांसाठी प्रथमच असा कायदा करण्यात आला आहे जो 30 दिवसांच्या आत माहिती देण्याची हमी देतो. आता लोकांची जबाबदारी आहे की जास्तीत जास्त कायदाचा वापर करत त्यास यशस्वी करणे. वांद्रे येथील कामगार आयुक्त भवन येथे उप आयुक्त भास्कर मोरडे, सहाय्यक आयुक्त रोहन रुमाले, सतीश तोटावर, प्रवीण कावळे, संतोष कोकाट, आनंद भोसले, अविनाश वडे, राजेश जाधव उपस्थित होते. तर कुर्ला एल वॉर्ड येथील प्रभाग समितीत आयोजित चर्चा सत्रात सहाय्यक आयुक्त महादेव शिंदे कार्यक्रमाचे अध्यक्ष होते. दोन्ही ठिकाणी अनिल गलगली यांनी जन माहिती अधिका-यांस मार्गदर्शन केले. तर जनजागृती ग्राहक मंच रायगड, पनवेल शाखा व पनवेल तालुका निवृत्त सेवक मंडळातर्फे काँग्रेस भवन हॉलमध्ये माहिती अधिकार दिन निम्मित माहिती अधिकार – शंका व समाधान या विषयावर नागरिकांना मार्गदर्शन केले. यावेळी केएल जाधव, बीपी म्हात्रे, सुभाष फडके, रमेश चव्हाण, शिवदास पालकर, रत्नाकर कुलकर्णी उपस्थित होते.