TOP NEWSUncategorizedमहाराष्ट्र

इलेक्ट्रॅानिक आणि सोशल मीडियातील जाहिराती प्रमाणित करून घेणे बंधनकारक – जिल्हाधिकारी तथा अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक -2024 अंतर्गत मुंबई उपनगर जिल्ह्यातील सर्व 26 विधानसभा मतदारसंघातील व्यक्तींनी अथवा उमेदवारांनी इलेक्ट्रॅानिक आणि सोशल मीडियात प्रसृत करण्यासाठीच्या जाहिराती माध्यम प्रमाणीकरण व संनियंत्रण समिती (एमसीएमसी) कडून प्रमाणित करून घेणे बंधनकारक असल्याचे जिल्हाधिकारी तथा अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी व समिती अध्यक्ष राजेंद्र क्षीरसागर यांनी सांगितले आहे.

इलेक्ट्रॅानिक आणि सोशल मीडियातील जाहिराती प्रमाणित करून घेणे बंधनकारक – जिल्हाधिकारी तथा अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर

मुंबई

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक -2024 अंतर्गत मुंबई उपनगर जिल्ह्यातील सर्व 26 विधानसभा मतदारसंघातील व्यक्तींनी अथवा उमेदवारांनी इलेक्ट्रॅानिक आणि सोशल मीडियात प्रसृत करण्यासाठीच्या जाहिराती माध्यम प्रमाणीकरण व संनियंत्रण समिती (एमसीएमसी) कडून प्रमाणित करून घेणे बंधनकारक असल्याचे जिल्हाधिकारी तथा अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी व समिती अध्यक्ष राजेंद्र क्षीरसागर यांनी सांगितले आहे.

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 अंतर्गत मुंबई उपनगर जिल्ह्यातील सर्व 26 विधानसभा मतदारसंघांसाठी कार्यरत जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणीकरण व संनियंत्रण समिती (Media Certification and Monitoring Committee) ची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी तथा अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी व समिती अध्यक्ष राजेंद्र क्षीरसागर यांच्या अध्यक्षतेखाली झाली.

यावेळी अपर जिल्हाधिकारी मनोज गोहाड, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) तेजस समेळ, समिती सदस्य निवडणूक निर्णय अधिकारी, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, समाजमाध्यम तज्ञ प्रा अभिजित पाटील, माहिती व प्रसारण मंत्रालयातील अधिकारी वैशाली त्रिवेदी, स्वतंत्र पत्रकार/माध्यम तज्ञ राजेंद्र हुंजे, पंकज दळवी, मनिषा रेगे, प्रसाद कुलकर्णी, तसेच सदस्य सचिव तथा माध्यम समन्वयक केशव करंदीकर उपस्थित होते.

मुंबई उपनगर जिल्ह्यातील सर्व 26 विधानसभा मतदारसंघांसाठी कार्यरत जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणीकरण व संनियंत्रण समिती (Media Certification and Monitoring Committee) कार्यरत आहे.

पेड न्यूजवरही ‘एमसीएमसी’ची करडी नजर

जाहिरात प्रमाणीकरणाबरोबरच पेड न्यूजला आळा घालण्यासाठी माध्यमप्रमाणीकरण व संनियंत्रण समिती (एमसीएमसी) कार्यरत असल्याचे जिल्हाधिकारी तथा अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी सांगितले आहे.

पेड न्यूजवरही ‘एमसीएमसी’ची करडी नजर असून पेड न्यूज आढळल्यास व समितीव्दारे ती पेडन्यूजअसल्याचे सिद्ध झाल्यास संबंधितांस नोटीस बजावण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी तथा अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button