समीर वानखेडे वाढवणार राष्ट्रवादीची डोकेदुखी? NIA मध्ये बदली होण्याची शक्यता
समीर वानखेडे वाढवणार राष्ट्रवादीची डोकेदुखी? NIA मध्ये बदली होण्याची शक्यता
मुंबई-अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान अटक (aryan khan arrest case) प्रकरणावरून वादात अडकलेले केंद्र अंमली पदार्थ विरोधी पथकाचे मुंबई झोनचे संचालक समीर वानखेडे (Sameer Wankhede extension Rejected) यांना अखेर मुदतवाढ मिळालीच नाही. समीर वानखेडेंना दोन वेळा सहा महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली होती मात्र आता ही मुदतवाढ केंद्रीय गृह खात्याने नाकारली आहे. त्यामुळे समीर वानखेडेंना पुन्हा त्यांच्या होम कॅडरमध्ये म्हणजेच भारतीय महसूल सेवेत परत जावे लागणार आहे. तसंच, NIA मुंबई संचालक ही दोन पदे सध्या रिकामे आहेत. यामुळे समीर वानखेडे यांची या दोन्हीपैकी एकापदी नियुक्ती होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.
राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्या आरोपानंतर समीर वानखेडे हे सतत वादात राहिले. आता 31 डिसेंबरला समीर वानखेडे यांचा कार्यकाळ संपला आहे. पण, वाढीव मुदत मिळावी यासाठी त्यांनी जोरदार प्रयत्न केला. पण दिल्ली गृहखात्याने समीर वानखेडे यांना मुदतवाढ देण्यास नकार दिला. त्यामुळे समीर वानखेडे पुन्हा त्यांच्या कॅडरमध्ये जाणार आहे. ED ADG म्हणून त्यांची नियुक्ती होवू शकते. तसंच, NIA चे DG म्हणून देखील समीर वानखेडे यांच्या नावाची चर्चा आहे. दरम्यान, समीर वानखेडे यांची या प्रकरणी खातेनिहाय चौकशी देखील केली गेली. आता समीर वानखेडे यांच्या संपत्तीबाबत देखील चौकशी सुरू आहे. दुसरीकडे त्यांच्या नावावर असलेला नवी मुंबईतील रेस्टॉरन्ट आणि बार याचे लायसन रद्द का करू नये याविषयी ठाणे जिल्हाधिकारी यांच्याकडे सुनावणी देखील सुरू आहे. एवढं सर्व होत असताना समीर वानखेडे यांना केंद्र सरकारने मदत नाकारली याचाच अर्थ एक प्रकारे या वादावर पडदा टाकण्याचा काम केले जाते का अशी चर्चा देखील दबक्या आवाजात सुरू आहे.
दुसरीकडे दोन मोठी प्रकरणे सध्या अंमलबजावणी संचालनालय आणि NIA कडे आहेत. यामुळे अंमलबजावणी संचालनालयचे मुंबई संचालक तसंच NIA मुंबई संचालक ही दोन पदे सध्या रिकामे आहेत. यामुळे समीर वानखेडे यांची या दोन्हीपैकी एकापदी नियुक्ती होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. जर अंमलबजावणी संचनालयाचा विचार केला तर आघाडीतील अनेक बड्या नेत्यांची प्रकरणी चौकशी करता अंमलबजावणी संचनालयाकडे दाखल आहेत. त्यात राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बडे नेते अनिल देशमुख यांचे प्रकरण असेल यासोबत खासदार भावना गवळी कॅबिनेट मिनिस्टर अनिल परब, अर्जुन खोतकर आणि प्राजक्त तनपुरे अशा दिग्गज नेत्यांच्या प्रकरणांचा तपास अंमलबजावणी संचालनालय करत आहे..
तर कार मायकल रोडवर स्फोटकांनी भरलेली हिरव्या रंगाची स्कॉर्पिओ गाडी प्रकरणी तपास एका विशिष्ट पातळीवरून थांबलेला आहे. या प्रकरणात देखील अनेक बड्या नेत्यांची नावे समोर येत असल्याची चर्चा सध्या सुरू आहे, यामुळे समीर वानखेडे यांची युक्ती अंमलबजावणी संचनालय किंवा NIA या दोनपैकी एका विभागात होऊ शकते. यामुळे समीर वानखेडे यांना मुदतवाढ न देऊन केंद्रीय गृह खात्याची नाचक्की झाली आहे की अंमलबजावणी संचालनालय आणि NIA सारख्या मोठ्या विभागात मोठ्यापदी समीर वानखेडे यांची नियुक्ती करून केंद्रीय गृह खातं राज्य सरकारला पुन्हा कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करेल हे येणारा काळच ठरवेल.