धारावीकरांचा उपयोग करुन मुंबईत व्होटजिहाद, मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार ॲड आशिष शेलार
धारावीकरांचा उपयोग करुन मुंबईत व्होटजिहाद, मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार ॲड आशिष शेलार
मुंबई, दि. २० आक्टोबर: शहरी नक्षलवादांच्या मार्गदर्शनानुसार उबाठा सेनेची लढाई ही अदानी साठी आहे. आमची लढाई धारावीतील गरिबांच्या घरासाठी आहे. धारावी पुनर्विकासाचा उपयोग करून तिथल्या रहिवाशांची माथी भडकवून, धारावीकरांचा उपयोग करून मुंबई व्होटजिहाद केला जातोय, असा गंभीर आरोप मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार ॲड आशिष शेलार यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला.
धारावीबाबत आज पुन्हा आमदार ॲड आशिष शेलार यांनी मुंबई भाजपा कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन आदित्य ठाकरे यांना थेट सवाल केले. कोणीही विचारले नसताना आपले पिताश्री वारंवार सांगतात हा मर्दांचा पक्ष आहे म्हणून जर तुम्ही मर्दांचा पक्ष असाल तर खुल्या चर्चेला या, तुम्ही सांगाल तिथे चर्चेला यायला मी तयार आहे. आदित्य ठाकरे यांना उत्तरे देता येत नाहीत म्हणून आमच्या वर्षाताई गायकवाड यांना पुढे करुन अडचणीत आणू नका, असेही आमदार ॲड आशिष शेलार म्हणाले. आपल्याच परिवारातील प्राणी मित्र एका युवकांसाठी धारावीतील नेचर पार्कचा 37 एकरचा भूखंड बळकवण्याचा प्रयत्न उद्धवजींच्या पक्षाकडून होतोय. त्यासाठीच धारावी पुर्नविकासाला विरोध केला जातोय असा अरोप आज पुन्हा एकदा आमदार ॲड आशिष शेलार यांनी केला.
ते पुढे म्हणाले की, फेक नेरेटिव्ह रोखणे माझे काम आणि मुंबईकरांच्या हितासाठी बोलणे माझे कर्तव्य आहे. आता राष्ट्रीय पक्षांचे काही नेते पण शहरी नक्षलवाद्यांचे अजेंडा मांडू लागलेत. म्हणून पळ काढणाऱ्या आदित्य ठाकरे यांना खुले आव्हान हिंम्मत असेल तर चर्चेला या. अन्यथा निर्बुध्द म्हणून तुम्हाला दिलेली पदवी खरी ठरेल, असेही ते म्हणाले.
अदानीला अधिकचा एफएसआय दिला असे खोटे पसरवले जाते आहे, पुर्नविकासाच्या प्रचलीत नियमापेक्षा एक इंचही अधिकचा एफएसआय धारावीसाठी देण्यात आलेला नाही त्यामुळे केवळ खोटं पसरवून, धारावीकरांची माथी भडकवून मते मिळवण्याचा प्रयत्न आदित्य ठाकरे करीत आहेत. मुंबईकरांनी सावधान झाले पाहिजे. आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी असा जो शिक्का धारावीच्या माथी आहे तो पुसण्याचा प्रयत्न आम्ही करीत आहोत. ४३० एक जागेपैकी २३० एकर जागेमध्ये मोकळया जागा, मैदान, बगिचा, मेट्रो, बस, मोनो, रेल्वे, भूयारी मेट्रोचा मल्टी कॉरिडॉर ट्रान्सपोर्ट हब येथे होणार आहे त्याला विरोध करुन त्यापासून मुंबईकरांना वंचित ठेवले जातेय. या भागातून मुंबई महापालिकेला एकही रुपयांचा मालमत्ता कर,सिव्हरेज टॅक्स, दुकान लायन्सन फी मिळत नाही हे उत्पन्न वाढवणारे तसेच रेंटल घर योजनेतून, घरांच्या विक्रीतून मुंबई महापालिकेला १५ हजार कोटी रुपयांचा महसूल मिळणार आहे त्याला विरोध केला जातोय. मुंबईत करून सावधान आणि म्हणून आमची विनंती आहे मुंबईकर तुम्ही व्यक्त व्हा, मुंबईकर तुम्ही तुमच्या मुलभूत अधिकारासाठी व्यक्त व्हा आणि धारावीकर हो तुम्ही तुमच्या हक्कासाठी व्यक्त व्हा, असे आवाहन त्यांनी केले. विरोधकांची लढाई अदानासाठी आहे आमची लढाई गरिबांच्या घरासाठी आहे.
त्यांच्या डोक्यात फक्त अदानी, आमच्या डोक्यात धारावी आणि मुंबईकराला मिळणाऱ्या सेवा सुविधा आहेत, म्हणून काही प्रश्न उपस्थित केले आहेत, ही सुरुवात आहे हिम्मत असेल तर उत्तरे दयावीत, असे आव्हानही त्यांनी केले.
काँग्रेसने २००० पुर्वीच्याच झोपडयांना संरक्षण दिले होते भाजपा सरकारने २०११ पर्यंतच्या झोपड्यांना संरक्षण दिले आहे. त्यामुळे धारावील २०११ पर्यंतच्या रहिवाशांना धारावीतच घरे मिळतील. त्यानंतरजी घरे आहेत म्हणजे ज्यांनी दोन मजले बांधले आहेत जी अशा पुर्नविकासात पात्र ठरत नाहीत अशा घरांनाही मुंबईतच घर मिळणार असून अशा प्रकारची घरे देणारी ही पहिली योजना असणार आहे. मग धारावीतील गरिबांना घरे मिळत असताना अदित्य ठाकरे यांचा विरोध का, असा सवाल त्यांनी केला.
आदित्य ठाकरे मराठी, मुस्लिम, दलित यांच्या विरोधी आहेत काय, आदित्य ठाकरे हे परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या बेदारांना घर या भूमिकेचे विरोधक आहेत, तुम्ही एवढे अती बुद्धिमान असाल तर मुंबई शहरात एक तरी प्रोजेक्ट दाखवा जो तुमचे पिताश्री मुख्यमंत्री असताना वरच्या मजल्यावरच्या किंवा 2011 नंतरच्या झोपडपट्टी वासियांना संरक्षित करून घर देण्याचा केला. असा सवालही आमदार ॲड आशिष शेलार यांनी केला आहे.
मुंबई पोलिसांनी नियमावली तयार करावी
ज्या पध्दतीने संजय राऊत यांनी मा. नाना पटोले यांना हाडतूड केल्याची माहिती मिळतेय त्यानुसार मुंबई पोलीस आयुक्तांनी यापुढे कायदा सुव्यवस्थेसाठी आघाडीच्या बैठकांबाबत काही नियम करण्याची गरज आहे.
१) नेत्यांनी पादत्राणे बाहेर ठेवावी
2) स्वसंरक्षणासाठी असेल तर असलेली शस्त्र बाहेर ठेवावीत
3) अंगरक्षक हत्यारे घेऊन आत सोबत ठेवू नये
कारण येत्या काळात महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपावरून गँगवाँर होऊ शकते. हाणामारी होऊ शकते. म्हणून पोलीसांनी आधीच काळजी घ्यावी, असा उपरोधिक टोला ही याबाबत विचारलेल्या प्रश्नावर बोलताना लगावला.