माजी आमदार आणि मंत्री बाबा सिद्दीकी यांची हत्या
मुंबईतील वांद्रे पश्चिम येथील काँग्रेसचे आमदार असलेले विद्यमान राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) नेते बाबा सिद्दीकी यांची तीन जणांनी गोळ्या झाडून हत्या केली आहे.
माजी आमदार आणि मंत्री बाबा सिद्दीकी यांची हत्या
श्रीश उपाध्याय/मुंबई
वांद्रे येथील खेरवाडीजवळ राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांच्यावर तीन जणांनी गोळ्या झाडल्या. बाबा सिद्दीकी यांना तीन गोळ्या लागल्या होत्या. त्यांना तातडीने लीलावती रुग्णालयात नेण्यात आले, मात्र रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे रुग्णालयातील सूत्रांनी सांगितले.
बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळ्या झाडणाऱ्या दोन हल्लेखोरांना अटक करण्यात आली आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
याप्रकरणी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, तीनपैकी दोन हल्लेखोरांना अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये एक आरोपी हरियाणाचा तर दुसरा आरोपी उत्तर प्रदेशचा आहे. पोलिसांना कडक कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
मुंबई पोलिसांनी तिसऱ्या शूटरचा शोध सुरू केला आहे. यासाठी हरियाणा आणि उत्तर प्रदेश पोलिसांचीही मदत घेतली जात आहे.
बाबा सिद्दीकी यांना १५ दिवसांपूर्वी जीवे मारण्याची धमकी मिळाली होती. मिळालेल्या माहितीनुसार, काही एसआरए प्रकल्पामुळे ही धमकी मिळाली होती. मात्र जाणकारांच्या म्हणण्यानुसार हल्ल्यात 9 एमएम पिस्तुलचा वापर करण्यात आला असून शूटर हरियाणा आणि उत्तर प्रदेशचा असल्याने या प्रकरणाचा लॉरेन्स बिश्नोईशीही संबंध असावा असा अंदाज वर्तवला जात आहे.