Uncategorized
गुन्हे शाखे 8ची अवैध कॉल सेंटरवर कारवाई, 14 जणांना अटक
मुंबई क्राईम ब्रँच 8 ने अवैध कॉल सेंटरवर कार्रवाई करत 14 जणांना अटक केली आहे.
गुन्हे शाखे 8ची अवैध कॉल सेंटरवर कारवाई, 14 जणांना अटक
श्रीश उपाध्याय/मुंबई
गुन्हे शाखा 8 चे पोलीस उपनिरीक्षक विकास मोरे यांना मालाड परिसरात काही लोक अवैध कॉल सेंटर चालवत असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. कॉल सेंटर्सच्या माध्यमातून फॉरेक्स मार्केट ट्रेडिंग करून ते गुंतवणूकदारांची फसवणूक करत होते.
या माहितीच्या आधारे पोलिसांनी छापा टाकून 14 जणांना अटक केली.
या छाप्यात कॉल सेंटरचा मालक अमर परेरा यालाही अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने सर्व आरोपींना 15 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे निर्देश दिले आहेत.
मुंबई गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त विशाल ठाकूर यांच्या सूचनेनुसार गुन्हे शाखा 8 चे प्रभारी पोलीस निरीक्षक लक्ष्मीकांत साळुंखे यांच्या पथकाने वरील कार्रवाई केली आहे.