Mumbai: घुसखोर मुक्त महाराष्ट्रासाठी निवडनूकी पूर्वी राज्यात NRC लागू करा नाही तर जनता स्वता लागू करणार -धर्मयोद्धा सुरेश चव्हाणके
मुंबई: देशात जवळपास १० करोड हून अधिक रोहिंग्या आणि बांग्लादेशी घुसखोर असून ज्यात सुमारे १ कोटी घुसखोर फक्त महाराष्ट्रात राहतात. एकट्या मुंबईत ४० लाख हून अधिक घुसखोर असून विभिन्न गुन्हे आणि देशविघातक कृत्यांमध्ये सहभागी असून त्याचा सांस्कृतिक, सामाजिक, आर्थिक, रोजगारा वर ही परिणाम झाला आहे. हे घुसखोर आपल्या राज्यातून तातडीने हाकलून लावणे ही काळाची गरज असून त्यासाठी जनता NRC हाच एक मार्ग आहे. आज 3 ऑक्टोबर पहिल्या नवरात्रीच्या दिवशी आम्ही राज्य सरकारला एनआरसी ची मागणी करतों; अन्यथा जनता या आंदोलनाची सुरवात करेल. अशी माहिती धर्मयोध्या डॉक्टर सुरेश चव्हाणके यांनी मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत दिली. या प्रसंगी लेफ्टनंट जनरल राजेंद्र निम्भोरकर, रणजीत सावरकरजी यांच्यासह लष्कर, नौदल, हवाई दल, नागरी सेवा दलातील अधिकारी आणि समाजातील विविध क्षेत्रांतील इतर मान्यवर उपस्थित होते.
बेकायदेशीर घुसखोरीमुळे निर्माण होणारे सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक समस्या निर्माण होत आहेत. राज्यातील गृह विभागाच्या एका अहवाला नुसार बांगला देशी आणि रोहिंग्या घुसखोर विरोधात हजारहून अधिक FIR विविध पोलिस ठाण्यात दखल आहेत. नुकतेच उल्हासनगर येथे गेली अनेक वर्ष वास्तव्य करत असलेल्या एका बांगला देशी महिलेला तिच्या कुटुंबासहित पकडण्यात आले. तिकडे असम मध्ये राहणारे ३ लाख घुसखोर बांगलादेश तेथील सरकारच्या कडक कारवाईला घाबरून राज्याबाहेर पळून महाराष्ट्र राज्यात आले आहे अशी आमची माहिती आहे. आपल्या महाराष्ट्रात सगळ्या अनधिकृत घुसखोरांनी राज्य सोडून निघून जावे अशी आमची मागणी आहे असे चव्हाणके पुढे म्हणाले.
प्रत्येक जिल्ह्यात जनता NRC ची टीम तयार झाली असून त्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात कार्यशाळा घेण्यात आलेल्या आहेत. बांगलादेशी घुसखोर हे पश्चिम बंगाल चे म्हणून येथे राहतात. त्यांची खरी ओळख पटावी म्हणून कोलकत्ता येथून 100 नागरिक महाराष्ट्रात येणार असून त्यांच्या भाषेवरून ते या घुसखोरांना ओळखणार आहेत आणि स्थानिक पोलिसांच्या ताब्यात देणार आहेत. दरम्यान हे आंदोलन संपूर्ण पणे अराजकीय राहणार असून आम्ही कायदा तोडणार नाही पण गनिमी काव्याने हे आंदोलन करणार आहोत. ज्या आंदोलनामुळे घुसखोरी थांबेल व राज्य घुसखोर मुक्त होईल असेही चव्हाणके ह्यांनी सांगितले. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी 9209 204 204 या नंबर वर मिस्ड कॉल द्यावा ही अपील ही करण्यात आली आहे. आंदोलनाची अधिक माहिती www.JanataNRC.org वर उपलब्ध आहे.