खासदार डॉ .श्रीकांत शिंदे यांच्या सहभागाने भविष्यात कल्याण पूर्वेच्या विकास कामांना गती येईल !
खासदार डॉ .श्रीकांत शिंदे यांच्या सहभागाने भविष्यात कल्याण पूर्वेच्या विकास कामांना गती येईल !
विजय कुमार यादव
कल्याण – कल्याण लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ . श्रीकांत शिंदे हे आता भारतीय जनता पार्टी बरोबर आहेत आणि राज्यात ना एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांची सत्ता असल्याने भविष्यात कल्याण पूर्वेचा गतीने विकास होईल असा विश्वास आमदार गणपत गायकवाड यांनी कल्याण पूर्वेतील एका चर्चेत व्यक्त केला .गेली १२ ते १३ वर्ष कल्याण पूर्व विधानसभा मतदार संघाचे प्रतिनिधीत्व करणारे आमदार गणपत गायकवाड यांना ‘वृत्त विशेष ‘ हॉटसॉप ग्रुपवर काही दिवसांपूर्वी ३ तासांच्या अनौपचारीक चर्चेल लक्ष करण्यात येऊन त्यांचे कडून कल्याण पूर्वेचा विकास झाला नसल्याचा निष्कर्ष काढला गेला होता तसेच त्यांच्या कार्यक्षेत्रा बाहेरील ही अनेक समस्या आणि नागरी विकास कामांना या चर्चेत त्यांनाच जबाबदार धरले गेले होते . त्या वेळी याच चर्चेत स्वःता आमदार गणपत गायकवाड यांनी सहभाग घेउन मला प्रत्यक्ष भेटून प्रश्न विचारा मी प्रत्येक प्रश्नांना उत्तर देण्यास तयार असल्याचे त्यांनी सांगितले होते . त्या नुसार बुधवारी सकाळी ११ वाजता प्रभाग ड कार्यालया समोर माहिती अधिकार कार्यकर्ते विनोद तिवारी यांनी उपस्थित केलेल्या १२ प्रमुख प्रश्नांसह उपस्थित नागरीकांच्याही प्रश्नांना आमदार गणपत गायकवाड यांनी सप्रमाण उत्तरे दिली . व प्रश्न कर्त्यांचे समाधान केले .
विनोद तिवारी यांच्या प्रत्येक प्रश्नांना त्यांनी अत्यंत संयमी भूमिकेतून उत्तरे देतांना सांगितले की आजपर्यंत मी किती कामे केली आहेत हे येथील सर्वसामान्य जनतेला चांगली माहित आहेत, म्हणूनच जनता मला निवडून देत आहे .गेल्या काही वर्षात मी निधी उपलब्द करून आणला तरीही कामे अडवली जात होती कारण उध्दव ठाकरे यांचे कडूनच ना . एकनाथ शिंदे यांची कामे आडवली जात होती, म्हणूनच एकनाथ शिंदे आता भाजपा बरोबर असल्याने भविष्यात खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांच्या सहभागाने कल्याण पूर्वेच्या विकासाला नक्कीच गती येईल असा विश्वासही या समयी त्यांनी व्यक्त केला .
कल्पाण पूर्वेतील लोकसंख्येच्या तुलनेत केवळ पोलिस चौक्या वाढवून फायदा नाही तर आणखिन एक पोलिस ठाणे या भागात होण्यासाठी आपला पाठपुरावा चालु आहे, कल्याण न्यायालयाच्या नवीन इमारतीसाठीही आपण पत्र व्यवहार केला आहे, कल्याण डोंबिवली महापालिकेतील करावरील शास्ती माझ्याच प्रयत्नाने कमी झाली असून त्याचा संपूर्ण महाराष्ट्राला लाभ झाल्याचेही त्यांनी सांगितले . प्रभाग ड कार्यालया समोरील मोकळ्या जागेवर २००७ साली पोलिस ठाणे निर्माण करण्याचा घाट घालण्यात आला होता परंतु मी आमदार नसतांनाही त्या वेळी या ठिकाणी बगीचा साठीचे भूमिपूजन वसंतराव डावखरे यांचे हस्ते केल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले .
विनोद तिवारी यांच्या प्रश्नांव्यतिरिक्त अन्य नागरीकांनीही या समयी विविध नागरी समस्यांकडे आमदार गणपत गायकवाड यांचे लक्ष वेधले असता या सर्व प्रश्नांना त्यांनी सकारात्मक उत्तरे दिली .
गेल्या ९ वर्षाहून अधिक काळ कल्याण पूर्वेतील विविध नागरी समस्यांना वाचा फोडण्यात आघाडीवर असलेल्या ‘ वृत्त विशेष ‘ या हॉटसॉप ग्रुपवर गेल्या आठवड्यात रात्री उशीरा पर्यंत रंगलेल्या चर्चेचे फलस्वरूप म्हणून आमदार गणपत गायकवाड यांनी बुधवारी सकाळची वेळ देउन त्यांनी माहिती अधिकार कार्यकर्ते श्री . विनोद तिवारी यांचे सह अनेक नागरीकांच्या प्रश्नांना सडेतोड सप्रमाण उत्तरे दिली . या आगळ्या वेगळ्या चर्चेची कल्याण पूर्व नागरीकांत जोरात चर्चा होऊ लागली आहे .