महाराष्ट्रमुंबई

Mumbai: सिनेट निवडणूका अराजकीय व्हाव्यात, मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अँड आशिष शेलार

सिनेट निवडणुकीत उबाठा सेनेचे उमेदवार हे विद्यार्थ्यांपेक्षा मालकाचे हित जोपासणारे असून त्यांच्याकडून निवडणूक प्रक्रियेला हरताळ फसला जात आहे, अशी टीका मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अँड आशिष शेलार यांनी आज येथे केली.

पत्रकारांशी संवाद साधताना आमदार अँड आशिष शेलार पुढे म्हणाले की,
सिनेटच्या उद्या हाऊ घातलेल्या निवडणूका अराजकीय व्हाव्यात अशी भाजपची इच्छा आहे.जे उमेदवार उबाठा गटाबे दिलेत ते विद्यार्थ्यांचे प्रतिनिधी आहेत का ? सगळ्या निवडणुकीची राजकीय बोळवण केली आहे. बोगस मतदार नोंदणी झाली तेव्हा आम्ही आक्षेप घेतला होता. आधी नोंदवले गेलेले पदवीधर सेनेच्या शाखेतून निर्माण केलेले पदवीधर होते. निवडणुकीय राजकीय पक्षाचे झेंडे दिसू नयेत अशी कुलगुरूंना विनंती असून अभाविप विद्यार्थ्यांसाठीची एकमेव संघटना आहे.

दरम्यान, अभाविपचे मुख्यमंत्र्यांवर आरोपाबाबत विचारलेल्या प्रश्नावर अँड शेलार म्हणाले की, त्यांना मुद्दा मांडण्याचा अधिकार आहे मात्र अभाविपच्या मताशी भाजप सहमत नाही.

अजितदादांसाठी भाजप शिंदेंचं चक्रव्यूह अशा बातम्या आल्या आहेत त्याबद्दल. विचारलेल्या प्रश्नांवर अँड शेलार म्हणाले की,
ही कपोलकल्पित बातमी आहे.
भाजप, शिंदे सेना आणि अजितदादांचा सामना करण्याची ताकद मविआ हरवून बसली आहे म्हणून
खोट्या बातम्यांचं राजकीय षडयंत्र रचलं जात आहे. जेव्हा उद्धव ठाकरे दिल्लीहून हात हलवत आले आणि मेळाव्यात मुख्यमंत्री पदाबाबत भूमिका मांडा असे म्हणाले. पण काँग्रेसने दाद दिली नाही. पवारांनी फटकारले. खरं तर तेव्हाच काँग्रेस आणि पवारांच्या राष्ट्रवादीने वेळ पडली तर ठाकरे सेनेला सोडून निवडणूक लढण्याची तयारी केली आहे, असा दावाही आमदार अँड आशिष शेलार यांनी केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button