महाराष्ट्रमुंबई

Mumbai: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते बुलढाणा शहरातील, संत-महापुरुषांच्या पुतळ्यांचे अनावरण

संत आणि महापुरुषांची स्मारके प्रेरणा व उर्जा देणारे ठरतील - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

शहरात उभारण्यात आलेले संत, महापुरुष यांची स्मारके आपल्या सर्वांना नेहमीत प्रेरणादायी व मार्गदर्शक ठरतील. ही स्मारके ऊर्जा देण्यासोबतच भावी पिढीला समतेचा आणि मानवतेचा संदेश देतील, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. बुलढाणा नगर परिषदेमार्फत बुलढाणा शहरातील विविध भागात संत आणि महापुरुषांचे पुतळे स्थापीत करण्यात आले आहेत. मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते आज या पुतळ्यांचे अनावरण करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते बुलढाणा शहरातील मलकापूर रोडवरील शिवरत्न शिवा काशिद, संत गाडगे बाबा तर जयस्तंभ चौकातील धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज, राष्ट्रमाता जिजाऊ माँ साहेब, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर व माता रमाबाई, महात्मा जोतिबा फुले व सावित्रीबाई फुले, संगम चौकातील छत्रपती शिवाजी महाराज आणि संत रविदास महाराज, शासकीय विश्रामगृह जवळील वसंतराव नाईक, राजर्षी शाहू महाराज, महात्मा बसवेश्वर महाराज, तहसील चौकातील नरवीर तानाजी मालूसरे आणि एडेड हायस्कूल चौकातील नरवीर बाजीप्रभू देशपांडे, कारंजा चौकातील अग्रसेन महाराज यांच्या पुतळ्याचे, जैन समाजाच्या स्मारकाचे तसेच भगवान वीर एकलव्य महाराज, महर्षी वाल्मिकी ऋषी, शहिद जवान युध्द स्मारकाचे अनावरण करण्यात आले.

यावेळी अनावरण कार्यक्रमास केंद्रीय आयुष व आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव, आमदार सर्वश्री संजय गायकवाड, संजय रायमूलकर, डॉ. राजेंद्र शिंगणे, श्रीमती श्वेता महाले, बुलढाणा नगर परिषदेचे मुख्याधिकारी गणेश पांडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button