Mumbai: सरकारचे ‘काळे कारनामे’ पाहता, सरकारी हस्तक्षेप वाढल्याने MPSC लाही भ्रष्टाचार, पेपरफुटीची कीड लागेल
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केली भीती
एमपीएससी सरकारी हस्तक्षेप वाढत असल्याने एमपीएससीची स्वायत्तता धोक्यात असल्याचे वृत आज वर्तमान पत्रांमध्ये प्रसिद्ध झाले. यावर प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सरकारी हस्तक्षेप वाढल्याने MPSC लाही भ्रष्टाचार, पेपरफुटीची कीड लागेल अशी भीती व्यक्त केली आहे.
जयंत पाटील यांनी आपल्या एक्स हँडलवरून ही प्रतिक्रिया दिली आहे. आपल्या प्रतिक्रियेत ते म्हणतात, आधी MPSC परीक्षांमध्ये होणारा घोळ, आता अधिकारी आणि कर्मचारी वर्गाने MPSCत होणाऱ्या सरकारी हस्तक्षेपाची तक्रार. या दोन्ही बाबी अत्यंत चिंताजनक आहे. MPSC परीक्षांसाठी सामान्य, गोरगरीब, होतकरू मुले प्रचंड मेहनत घेत असतात. या सरकारचे आतापर्यंतचे ‘काळे कारनामे’ पाहता, सरकारी हस्तक्षेप वाढल्याने MPSC लाही भ्रष्टाचार, पेपरफुटीची कीड लागण्याची भीती आहे. त्यामुळे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची तक्रार ग्राह्य धरून MPSC ची स्वायत्तता अबाधित ठेवली पाहिजे. MPSC जर स्वतःची स्वायत्तता ठिकवून ठेवू शकत नसेल तर मुलांच्या भविष्याचे तरी रक्षण कसं करेल, हा खरा प्रश्न आहे !