महाराष्ट्रमुंबई

Mumbai: घाटकोपर स्थित महाविद्यालयांचा प्रशासकीय अधिकाऱ्याला अटक

मुंबईतील घाटकोपर पश्चिम येथील महाविद्यालयांची प्रशासकीय अधिकारी रवींद्र सिंग यांना प्रवेशासाठी लाच घेतल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे.

तक्रारदाराच्या मुलीने अकरावी वाणिज्य शाखेच्या प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज केला होता. अर्जात सहा महाविद्यालयांची नावे भरण्यात आली होती, त्यात यामहाविद्यालयाचेही नाव होते. दोन वेळा त्यांचे नाव यादीत न आल्याने तक्रारदाराने महाविद्यालयाचे प्रशासकीय अधिकारी रवींद्र सिंग यांच्याशी संपर्क साधला. रवींद्र सिंग याने तक्रारदाराकडे प्रवेश देण्यासाठी दीड लाख रुपयांची मागणी केली. तक्रारदाराला देणगी द्यायची नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून 29 ऑगस्ट रोजी रविंदरसिंगला 50 हजार रुपये घेताना रंगेहात पकडले.
पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button