महाराष्ट्रमुंबई

Mumbai: मंत्री तानाजी सावंत मुख्यमंत्री शिंदे यांच्या मनातलं बोलले…..महेश तपासे

कॅबिनेटला अजित पवारांच्या मांडीला मांडी लावून बसावं लागतं व बाहेर आल्यानंतर उलट्या होतात असं वक्तव्य केलं आहे शिंदे सरकारचे मंत्री तानाजी सावंत यांचं.

सावंत यांच्या या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे मुख्य प्रवक्ते महेश तपासे म्हणाले ” अजितदादांसारखा एक नेता अशा प्रकारचा अपमान कसं काय सहन करू शकतो हेच कळत नाही. सत्तेसाठी एवढी लालसा अजित दादांच्या मनात असावी हे कधी वाटलं नव्हतं. त्यांच्यातला स्वाभिमानी बाणा कुठे हरपला याचा शोध अजित दादांच्या पक्षातल्या पदाधिकाऱ्यांनी घेण्याची आवश्यकता आहे असा टोला महेश तपासे यांनी लगावला.

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टीची झालेली पीछेहाट याला सर्वस्वी जबाबदार अजित पवार आहेत असा सूर आरएसएस व भाजपने खुलेआम उपस्थित करून अजित पवारांना जबाबदार ठरविले. त्यातच शिंदे सेनेच्या पदाधिकाऱ्यांची अजितदादा विषयी भूमिका व त्यांना सरकारमध्ये सामील केल्याबाबतची नाराजी ही आता उघड उघड समोर येऊ लागलेली आहे.

तपासे पुढे म्हणाले शरद पवार साहेबांच्या पक्षापासून फारकत घेत अजित पवार यांनी विकासाच्या साठी सत्तेमध्ये जात आहोत अशी घोषणा केली होती त्याला दुजोरा प्रफुल पटेल, छगन भुजबळ,सुनील तटकरे व आदी नेत्यांनी दिला होता. आता अजित दादांच्या अस्तित्वावरच घाला मंत्री तानाजी सावंत यांनी घातल्यानंतर अजित पवारांच्या पक्षातील हे सर्व नेते गप्प का असा सवाल महेश तपासे यांनी उपस्थित केला.

विधानसभेमध्ये महायुतीकडून 80 ते 90 जागा मिळवू अशी घोषणा छगन भुजबळ यांनी केली होती आता 25 जागा मिळतील की नाही याचीही शाश्वती अजित दादांच्या राष्ट्रवादीला राहिली नाही आणि म्हणूनच त्यांना अशा प्रकारचा अपमान सहन करावा लागतो असेही तपासे म्हणाले.

शरदचंद्र पवार साहेबांच्या पक्षांमध्ये अजितदादा असताना त्यांच्या बाजूला बसण्यासाठी कार्यकर्त्यांमध्ये मोठी चढाओढ असायची. त्याच अजितदादांच्या बाजूला बसून शिंदे सरकारच्या मंत्र्यांना उलट्या होतात हे अगदी मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मनातलं तानाजी सावंत बोलून गेले की काय असा सवाल तपासे यांनी उपस्थित केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button