Uncategorized

माझी सुरक्षा काढून ते पोलीस कर्मचारी जनतेच्या सुरक्षेसाठी द्या सुप्रियाताई सुळे यांची गृहमंत्र्यांना विनंती

महिला सुरक्षेच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रियाताई सुळे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांना एक पत्र लिहलंय. या पत्रात त्यांनी माझी पोलीस सुरक्षा व्यवस्था तातडीने काढा, अशी विनंती केली आहे.

माझी सुरक्षा काढून ते पोलीस कर्मचारी जनतेच्या सुरक्षेसाठी द्या सुप्रियाताई सुळे यांची गृहमंत्र्यांना विनंती


मुंबई दि. २१ ऑगस्ट

मागील काही दिवसांपासून राज्यात महिला अत्याचाराचे प्रमाण वाढलंय. बदलापूर येथील घटनेनं संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून टाकलं आहे. दरम्यान,

राज्यात कायदा सुव्यवस्था बिघडत चालली आहे. त्यामुळे पोलिसांवर प्रचंड तणाव येतोय. त्यातच राजकीय नेत्यांना पोलिस संरक्षण दिले जात आहे. त्यामुळे माझे पोलिस संरक्षण काढून ते जनतेच्या सेवेत द्यावे, असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्ष तथा खासदार सुप्रियाताई सुळे यांनी अशी विनंती सोशल मीडियावर पोस्ट करत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केली आहे.

सुप्रियाताई सुळे म्हणाल्या की, राज्यात प्रंचड गुन्हेगारी वाढली आहे, असे केंद्र सरकारचा डेटा सांगत आहे. महिला अत्याचाराचा विषय खूप गंभीर होत आहे. जनता रस्त्यावर आल्यानंतर सरकारला जाग आली. शक्ती कायदा जो मविआच्या काळात आणला होता त्यांचे या सरकारने काय केले असा सवाल सुप्रियाताई सुळेंनी उपस्थित केला आहे.

पुढे सुप्रियाताई सुळे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हणाल्या की, महाराष्ट्रातील कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती गेली काही महिन्यांपासून अतिशय गंभीर आहे. जनता असुरक्षित वातावरणात जगत असून सततच्या अप्रिय घटनांमुळे नागरिकांच्या मनामध्ये भीतीचे वातावरण आहे. महिला,अबालवृद्ध कुणीही सुरक्षित नाहीत. गुन्हेगार निर्वावले असून कायद्याचा धाक उरलेला नाही. यंत्रणा राबविताना पोलिस यंत्रणेवर प्रचंड मोठा ताण पडतोय, हे स्पष्टपणे दिसत आहे. असेही सुप्रियाताई सुळे यांनी सांगितले आहे.

सुप्रियाताई सुळे म्हणाल्या की, दुसरीकडे माझ्यासह अनेक आजी-माजी लोकप्रतिनिधींच्या सुरक्षेसाठी मोठी पोलीस यंत्रणा काम करत आहे. परंतु एका बाजूला कायदा व सुव्यवस्था राखण्यात पोलीस यंत्रणेचं बळ कमी पडत असताना दुसरीकडे हि सुरक्षा घेणं योग्य नाही. म्हणून गृहमंत्र्यांना माझी विनंती आहे की कृपया माझ्या सुरक्षेसाठी तैनात करण्यात आलेली पोलीस सुरक्षा तातडीने काढून घ्यावी. माझ्या सुरक्षेसाठी दिलेले हे पोलीस अधिकारी जनतेच्या सुरक्षेसाठी नियुक्त करावेत. असेही सुप्रियाताई सुळे यांनी स्पष्ट केले आहे.

यासोबतच राज्यातील ज्यांना ज्यांना सुरक्षा व्यवस्था दिली आहे त्या सर्वांच्या सुरक्षेच्या गरजेबाबत तातडीने आढावा घ्यावा व ज्यांना गरज नाही, त्यांची सुरक्षा काढून ते पोलीस कर्मचारी जनतेच्या सुरक्षेसाठी देण्यात यावे. राज्यातील कायदा व सुव्यवस्था चोख राहावी व जनतेला सुरक्षित वातावरण मिळावे यासाठी गृहमंत्र्यांनी हा निर्णय तातडीने घ्यावा ही नम्र विनंती असे सुप्रियाताई सुळे यांनी म्हटले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button