महाराष्ट्रमुंबई

Mumbai: मेट्रो 2 बी गर्डरची उंची वाढविण्यासाठी एमएमआरडीए विमानतळ प्राधिकरणाकडे करणार पत्रव्यवहार

उमेश गायकवाड यांनी कुर्ल्यातील बदलती भौगोलिक स्थितीचा उहापोह करत मार्ग बदल करण्यास तीव्र विरोध केला आणि कुर्ल्यातील नागरिकांना प्रत्येक वेळी गृहीत धरण्याची मानसिकता बदलण्याची मागणी केली.

मेट्रो 2 बी गर्डरची उंची वाढविण्यासाठी एमएमआरडीए विमानतळ प्राधिकरणाची पत्रव्यवहार करील आणि नागरिकांना दिलासा देण्यासाठी योग्य कार्यवाही करेल,असे आश्वासन एमएमआरडीए तर्फे देण्यात आले. कुर्ला एल विभागात पालिका, एमएमआरडीए, कुर्ला पोलीस आणि स्थानिक नागरिकांची बैठक आयोजित करण्यात आली होती.

मेट्रो 2 बी गर्डरची उंची सद्या हलावपुलावर 3.50 मीटर आहे. गणेशोत्सव आणि नवरात्रौत्सव दरम्यान या मार्गाचा वापर वाहतुकीसाठी केला जातो. त्यामुळे येथून गणपती व देवीच्या मूर्ती नेण्यास अप्रत्यक्ष अडथळा निर्माण झाला आहे. आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मुद्दा उपस्थित केला की मेट्रो 2 बी चा मार्ग बदलला नसता तर ही वेळ आली नसती. मार्ग बदलताना नागरिकांच्या तक्रारी आणि आक्षेप मागवला आहे तर त्याची माहिती देण्यात यावी. 3.50 मीटर उंचीची परवानगी ही 2017 असून एमएमआरडीए तर्फे पुन्हा एकदा विमानतळ प्राधिकरणाकडे उंची 5.50 मीटर करण्याची मागणी करावी. यामुळे भविष्यात मेट्रो रेल्वेला सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून काळजी राहणार नाही.

उमेश गायकवाड यांनी कुर्ल्यातील बदलती भौगोलिक स्थितीचा उहापोह करत मार्ग बदल करण्यास तीव्र विरोध केला आणि कुर्ल्यातील नागरिकांना प्रत्येक वेळी गृहीत धरण्याची मानसिकता बदलण्याची मागणी केली. पालिकेचे अधिकारी जीवन राठोड यांनी चर्चेच्या अंती सर्व मागण्याबाबत एमएमआरडीए अधिकारी वर्गास सूचना केल्या तर एमएमआरडीएचे अधिकारी धोत्रे यांनी मेट्रो 2 बी गर्डरची उंची वाढविण्यासाठी एमएमआरडीए विमानतळ प्राधिकरणाकडे पत्रव्यवहार करण्यासाठी वरिष्ठ पातळीवर चर्चा करण्याचे आश्वासन दिले.

याववेळी कुर्ला पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक खोत, पालिका अधिकारी नितीन देशमुख, सागर पाटील, सुनील पाटील, अजय शुक्ला, कमलाकर बने, विजय मांढरे, शशिकांत आंब्रे, संदीप हुटगी, किरण माने, चेतन कोरगांवकर, अतुल चव्हाण, गणेश चिकने, रविंद्र बनसोडे, दिपू सिंह, संजय देवरुखकर, आनंद मोरजकर, अमित कांबळे, संजय ठाकूर आदि उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button