महाराष्ट्रमुंबई

Mumbai: जखमी गोविंदावर नानावटीत उपचार

त्याला नानावटी रुग्णालयात दाखल करुन आवश्यक ती सर्व मदत आमदार अँड आशिष शेलार यांनी उपलब्ध करून दिली आहे. आज त्याच्या पायावर शस्त्रक्रिया करण्यात आली.

सांताक्रूझ पश्चिम गझदरबांध येथे सराव शिबिरा दरम्यान जखमी झालेल्या गोविंदावर नानावटी रुग्णालयात उपचार करण्यात येत असून स्थानिक आमदार अँड आशिष शेलार यांनी त्याच्या उपचाराची जबाबदारी उचलली आहे.

गजधरबांध येथील अष्टविनायक बाल मित्र मंडळ पथकाचा गोविंदा अमित ठाकूर सरावादरम्यान 17 आँगस्टला रात्री जखमी झाला. त्यांच्या पायाच्या हाडाला इजा झाली असल्याने तातडीने
त्याला नानावटी रुग्णालयात दाखल करुन आवश्यक ती सर्व मदत आमदार अँड आशिष शेलार यांनी उपलब्ध करून दिली आहे. आज त्याच्या पायावर शस्त्रक्रिया करण्यात आली.
दरम्यान, आज दुपारी रुग्णालयात जाऊन आमदार आशिष शेलार यांनी त्याची भेट घेऊन विचारपूस केली. नातेवाईकांना आणि उपचार करणाऱ्या डॉक्टरांशी संवाद साधून माहिती घेतली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button