महाराष्ट्रमुंबई

Mumbai: कुर्ला हलावपुलाजवळ मेट्रो 2B चा गर्डर अटकला

भद्रगोंड यांना पत्र लिहून या गर्डरमुळे भविष्यात उद्भवणाऱ्या समस्यांवर योग्य तोडगा काढण्याची विनंती केली आहे.

मेट्रो 2 बी अंतर्गत कुर्ला पश्चिम हलावपुल पुलावरून जाणाऱ्या गर्डरमुळे कुर्लावासीयांमध्ये संताप आहे. या गर्डरमुळे पुलावरून 3.50 मीटर उंचीपर्यंत वाहने जाऊ शकतात. या संदर्भात आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी एमएमआरडीए आयुक्त डॉ. संजय मुखर्जी आणि मेट्रोचे संचालक बसवराज एम. भद्रगोंड यांना पत्र लिहून या गर्डरमुळे भविष्यात उद्भवणाऱ्या समस्यांवर योग्य तोडगा काढण्याची विनंती केली आहे.

आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी दिलेल्या माहितीनुसार, कुर्ला डेपोपासून हलावपूलकडे जाणारा ट्रॅक हलावपूल येथे 3.50 मीटर आहे. हा मार्ग महत्त्वाचा आहे. या मार्गाचा वापर दरवर्षी गणेशोत्सव आणि नवरात्रीदरम्यान वाहतुकीसाठी केला जातो. त्यामुळे येथून गणपती व देवीच्या मूर्ती नेण्यास अप्रत्यक्ष अडथळा निर्माण झाला आहे. याबाबत तमाम कुर्लेकरांच्या तीव्र भावना आहेत. कारण मूळ आराखड्यात मेट्रो 2 बी चा मार्ग येथून नव्हता. या बदलांबाबत सार्वजनिक सूचना जारी करून नागरिकांचे मत जाणून घेतले असते तर नक्कीच ही परिस्थिती उद्भवली नसती.

या संपूर्ण प्रकरणाबाबत कुर्लावासीयांनी कुर्ला मेट्रो संघर्ष समिती स्थापन करण्यात आली आहे. आत्तापर्यंत संपूर्ण कुर्ल्यात 5 बैठका झाल्या आहेत. भविष्यात कोणताही विघ्न येऊ नये म्हणून सर्व मंडळे एकत्र आली आहेत.
[3:18 am, 17/8/2024] +91 96533 57049: ..

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button