Mumbai: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा महासंसदरत्न खासदार सुप्रियाताई सुळे
डिजिटल सुरक्षा ही अतिशय महत्त्वाची बाब, असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा महासंसदरत्न खासदार सुप्रियाताई सुळे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटले आहे.
नागरीकांना माझी विनंती आहे की आवश्यक ती सर्व काळजी घेऊनही माझे व्हॉट्सॲप हॅक झाले होते. कृपया आपण सर्वजण डिजीटल सुरक्षेविषयी आवश्यक ती काळजी घ्या. व्हॉट्सॲप वापरताना टू फॅक्टर व्हेरीफिकेशन करुन घ्या. आपले पासवर्ड, ओटीपी कुणालाही देऊ नये. तसेच अनोळखी क्रमांकावरुन आलेल्या लिंक क्लिक करु नये. डिजिटल सुरक्षा ही अतिशय महत्त्वाची बाब असून आपण आवश्यक ती काळजी घायला हवी. असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा महासंसदरत्न खासदार सुप्रियाताई सुळे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटले आहे.
सुप्रियाताई सुळे म्हणाल्या की, हॅकरने माझं अकाऊंट परत देण्याच्या बदल्यात माझ्याकडे ४०० डॉलर्सची मागणी केली. हॅकरकडून अकाऊंट परत मिळवण्यासाठी पैसे दिले नाहीत. पोलिसांनी व व्हॉट्सॲप टीमने माझं अकाऊंट परत मिळवून दिलं आहे. माझे व्हॉट्सॲप सुरू झाले आहे. व्हॉट्सॲप टीमने यासाठी अतिशय मोलाचे सहकार्य केले. याबद्दल टिम व्हॉट्सॲप व पुणे ग्रामीण पोलिसांचे मनापासून आभार. दरम्यानच्या काळात कुणी मेसेज केले असतील तर त्यांना मला या तांत्रिक बिघाडामुळे रिप्लाय करता आला नाही, याबद्दल क्षमस्व. असे सुप्रियाताई सुळे म्हणाल्या.
सुप्रियाताई सुळे म्हणाल्या की, मला फोनवर ओळखीच्या व्यक्तीकडून मेसेज आला होता हा मेसेज ओपन केल्यानंतर माझा फोन हँग झाला. तसेच माझ्या जवळच्या दोन ते तीन व्यक्तींचा देखील मोबाईल हॅक झाला. पक्षाच्या प्रदेश सरचिटणीस कु. अदिती नलावडे यांचा देखील मोबाईल हँग झाला होता. तसेच माझ्या आणि अदिती नलावडे यांच्या मोबाईल वरून १० हजार रुपये पाठवा असे मेसेज करण्यात आले होते. पोलिसांनी मला सांगितले आहे की हॅकरची नवीन सिस्टीम आलेली आहे. असेही सुप्रियाताई सुळे यांनी सांगितले आहे.
पुढे सुप्रियाताई सुळे म्हणाल्या की, केंद्र सरकार विरोधात जेव्हा जेव्हा मी संसदेत बोलते तेव्हा सदानंद सुळे यांना आयकर विभागाची नोटीस येते हा योगायोग म्हणावा का? सेम नोटीस येते फक्त तारीख बदलली जातेय असे सुप्रियाताई सुळे म्हणाल्या.
सुप्रियाताई सुळे म्हणाल्या की, राज्यातील मराठा आरक्षणाविषयी राज्य सरकारने विशेष अधिवेशन बोलवायला पाहिजे या अधिवेशनात चर्चा करून आरक्षणाविषयी बिल केंद्र सरकारकडे पाठवले पाहिजेत असेही सुप्रियाताई सुळे यांनी स्पष्टपणे सांगितले आहे.
सुप्रियाताई सुळे यावर सविस्तर बोलताना म्हणाल्या की, शिवसेना शिंदे गटाने पार्लांमेंटमध्ये स्ट्रांगली भूमिका मांडली. अजित पवार आणि शिंदे युतीत आहेत. मग शिंदेंची आणि अजित पवार यांची भूमिका एकच आहे का? अजित पवारांच्या पक्षाने पार्लांमेटमध्ये भूमिका मांडल्याचे माझ्या ऐकिवात नाही. असे सुप्रियाताई सुळे म्हणाल्या.
सुप्रियाताई सुळे म्हणाल्या की, उद्धव ठाकरे, अमोल मिटकरी, जितेंद्र आव्हाड, राज ठाकरे यांच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्याच्या विरोधात आहे. आमच्या पक्षाकडून जर झालं असतं तर मी स्ट्रॉग एक्शन घेतली असती. असेही सुप्रियाताई सुळे यांनी स्पष्टपणे सांगितले.