नसीम खान यांचे राजकीय क्षेत्रासहीत सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातही उल्लेखनीय कार्य …. नाना पटोळे
कॉँग्रेस अध्यक्ष नाना पटोळे यांनी आज चांदिवली विधानसभा मध्ये आयोजित एसएससी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गुणगौरव व करिअर गायडंन्स कार्यक्रमात व्यक्त केले.
मुंबई/प्रतिनिधी: माजी मंत्री व प्रदेश कार्याध्यक्ष मो आरिफ (नसीम) खान यांनी राजकीय क्षेत्रासहीत सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातही अनेक उल्लेखनीय कार्य केले आहे असे वक्तव्य प्रदेश कॉँग्रेस अध्यक्ष नाना पटोळे यांनी आज चांदिवली विधानसभा मध्ये आयोजित एसएससी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गुणगौरव व करिअर गायडंन्स कार्यक्रमात व्यक्त केले.
आज चांदिवली विधानसभा मतदार संघात माजी मंत्री व प्रदेश काँग्रेस कार्याध्यक्ष मो आरिफ (नसीम) खान यांच्या वतीने सर्वाधिक गुण मिळवून एसएससी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या प्रत्येकी 10 विद्यार्थ्यांसह शाळेचे मुख्याध्यापक यांचा सत्कार समारंभ व विद्यार्थीकरिता करिअर गायडंन्स कार्यक्रम आयोजित करण्यात आला. चांदिवली मतदार संघातील विविध माध्यमाच्या एकूण 60 शाळेमधील प्रत्येकी 10-10 विद्यार्थ्यांपैकी प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांस एक ट्रॉफी, प्रमाणपत्र व शैक्षणिक अनुदान (शिष्यवृत्ती) म्हणून रोख रक्कम 5000 रुपयासह शैक्षणिक साहित्य देण्यात आले. तसेच उर्वरित नऊ विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व शैक्षणिक साहित्य देऊन गौरविण्यात आले. त्यानंतर विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीकरिता करिअर मार्गदर्शक शिबिर घेण्यात आले या शिबिरात मोटिवेशनल स्पीकर इरफान कौचाली, योगिता दिनेश मधुकुंटा आणि अकशा बद्रुद्दीन खान यांनी योग्य ते मार्गदर्शन करीत विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवले.
याप्रसंगी प्रदेश काँग्रेस अध्यक्ष नाना पटोळे, आमदार भाई जगताप, अंजुमन ए इस्लामचे अध्यक्ष पद्मश्री डॉ. झहीर काजी, उद्योजक व समाजसेवक वी आर शरीफ, जेनेट डिसोजा यांनीही उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला यशस्वी बनवण्यासाठी मुंबई प्रदेश काँग्रेस उपाध्यक्ष शरीफ खान, प्रभाकर जावकर, गणेश चव्हाण, मो गौस शेख, शरद पवार, मनोज तिवारी, दिनेश मधूकुंटा, रवी हिंगमिरे, शब्बीर तांबोळी, नितीन पवार, मुजकिर इनामदार, अंगदप्रसाद गुप्ता, रियाज मुल्ला, सुभाष गायकवाड, फैयाज शेख, रियाज खान, रेहान खान, गुलजार मंसूरी यांच्यासहित आलम सर खलील खोत, नासिर गोहर खान, समीर अख्तर आदींनी विशेष योगदान दिले.