१८ वर्षे पूर्ण झालेल्या तरुणांना मतदार नोंदणी करण्याचे आवाहन
प्रतिक्षानगर विभागातील टी-१ ते टी-६७. एमआयजी - १ ते १२, एलआयजी १ ते १२, एचआयजी १ ते १२, बहुमजली इमारती क्र. १ ते २०, जुनी इमारत क. २ ते ६. आणि अल्मेडा
मुंबई: आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक, २०२४ च्या पार्श्वभूमीवर, भारत निवडणूक आयोग, नवी दिल्ली यांनी मतदार यादीचे विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे. या कार्यक्रमानुसार राज्यातील सर्व विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्रनिहाय असलेल्या याद्यांचा पुनरिक्षण कार्यक्रम निर्धारित करून देण्यात आलेला आहे. या पुनरिक्षण कार्यक्रमानुत्तार दि. ०१ जुलै २०२४ या अर्हता दिनांकावर वयाची १८ वर्षे पूर्ण झाली आहेत, अशा नागरिकांची मतदार नोंदणी करणे, जे नागरिक नव्याने मतदारसंघात वास्तव्यास आले आहेत अशा नागरिकांची त्यांच्या मूळ मतदार संघातून स्थलांतर करून मतदार नोंदणी करणे, या मतदारसंघातून अन्य मतदारसंघात वास्तव्याकरिता स्थलांतरित झाले आहेत, अशा मतदारांची वगळणी करणे अपेक्षित आहे.
१७९- सायन कोळीवाडा विधानसभा मतदारसंघात विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या मतदारसंघातील प्रत्येक सहकारी गृहनिर्माण संस्थेमध्ये त्या संस्थेतील रहिवाशांसाठी विशेष मतदार नोदणी शिबिर आयोजित करण्यात येणार असून पहिल्या टप्प्यात प्रतिक्षानगर विभागातील टी-१ ते टी-६७. एमआयजी – १ ते १२, एलआयजी १ ते १२, एचआयजी १ ते १२, बहुमजली इमारती क्र. १ ते २०, जुनी इमारत क. २ ते ६. आणि अल्मेडा कंपाऊंड सह म्युनिसिपल कॉलनीतील सर्व अशा एकूण १५० इमारतीमधील नागरीकांची नोदणी करण्यात येणार आहे.
१७९ सायन कोळीवाडा विधानसभा मतदारसंघाच्या मतदारयादीमध्ये प्रतिक्षानगर विभागातील बहुतांश मतदारांचा पत्ता चाळीमधील आहे, ज्या प्रत्यक्षात अस्तित्वात नसून या ठिकाणी बहुमजली इमारती आहेत. या विशेष नोंदणी शिबिरामध्ये प्रतिक्षानगरमधील सर्व रहिवासी मतदारांची मतदारयादीतील नोंदीमध्ये चाळींऐवजी त्या-त्या इमारतीचा पता नमूद करण्यात येणार आहे. त्याकरिता नवमतदारांकडून नमुना नं -६, मतदारयादीत नाव आहे. तथापी, पत्त्यात बदल आहे. अशा मतदारांकडून् नमुना नं ८ आणि मयत / कायमस्वरुपी स्थलांतरीत मतदारांच्या नातेवाईकांकडून नमुना नं.७ जमा करुन भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार याबाबत मोहीम राबविण्यात येत आहे.
सर्वच राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक घेवून त्यांचे मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधी यांची निवड करुन याकामी क्षेत्रीय स्तरावरील कामकाज करणा-या कर्मचा-यांना मदत करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे प्रतिक्षानगरमधील सर्व सहकारी सोसायटीच्या अध्यक्ष व सचिव यांना या मोहिमेबद्दल सोशल मीडिया आणि भित्तीपत्रके आणि पत्राव्दारे व्यापक माहिती देण्यात आली आहे.
सहकारी संस्थांचे अध्यक्ष व सचिव यांना महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम ७९अ नुसार मतदान केंद्रस्तरीय स्वयंसेवक म्हणून घोषित करण्यात आले असून सहकारी सोसायटी सदस्यांसाठी मतदार नोंदणी करणे, मयत व स्थलांतरीत मतदारांची वगळणी करणे, याकरिता मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्याशी समन्वय साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे, असे 179-सायन कोळीवाडा विधानसभा मतदासंघाचे मतदार नोंदणी अधिकारी यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.