सचिन वाजे यांच्या आरोपामुळे महाराष्ट्राचे राजकारण पुन्हा तापले
अँटिलिया प्रकरणात अटक करण्यात आलेले पोलीस अधिकारी सचिन वाजे यांनी पुन्हा एकदा लेखी स्वरूपात महाविकास आघाडी सरकारवर दरमहा
श्रीश उपाध्याय/मुंबई: अँटिलिया प्रकरणात अटक करण्यात आलेले पोलीस अधिकारी सचिन वाजे यांनी पुन्हा एकदा लेखी स्वरूपात महाविकास आघाडी सरकारवर दरमहा १०० कोटी रुपयांची वसूली केल्याचा आरोप केला आहे. वाजे यांच्या आरोपाबाबत भारतीय जनता पक्षाने पुन्हा एकदा विरोधकांवर हल्लाबोल केला आहे.
कृष्णा हेगड़े-
भाजपचे मुंबई सरचिटणीस संजय उपाध्याय यांनी विरोधकांचा तीव्र शब्दात निषेध करत सचिन वाजे यांच्या आरोपामुळे विरोधकांचा पर्दाफाश झाल्याचे म्हटले आहे. तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख आणि तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या महावसुली सरकारचे वास्तव जनतेसमोर आले आहे.
याप्रकरणी तीव्र प्रतिक्रिया देताना भाजपचे प्रवक्ते आणि आमदार राम कदम म्हणाले की-
वसुलीबाज अन ठाकरे- पवार यांचा लाडका वाजेला ऐकल्यावर
राजेश खन्ना च्या जुन्या गाण्याची आठवण येते …
“” सच्च्याई छुप नही सकती बनावट के उसूलो से..
खुशबू आ नही सकती कागज के फुलो से “”
राम कदम-
आदरणीय देवेंद्रजी जे पोट तीडकीने सांगत होते
ते सत्य अखेर समोर आलं.
आता लोकांनी ठरवायचे
ह्या वसुलीबाज मंडळींनी महाराष्ट्राच्या लोकांना हलक्यात घेत ,म्हणजे गृहीत धरत,खोटा भ्रम, खोटे न्यारे्टिव पसरवून लोकसभेत मत घेतली.
अन आता पुन्हा महाराष्ट्राच्या जनतेला गृहीत धरत नव्याने भ्रम पसरवण्याचा प्रयन्त करता आहेत.त्यांना बळी पडणार का वसुलीबाजाना विधानसभेत त्यांची जागा दाखवणार?
याच विषयावर बोलताना शिवसेनेचे प्रवक्ते व माजी आमदार कृष्णा हेगडे म्हणाले की – सचिन वाजे यांच्या आरोपांमुळे महाराष्ट्र विकास आघाडी, महा वसूली आघाडीचे सरकार असल्याचे स्पष्ट झाले आहे.