महाराष्ट्रमुंबई

डॉ. बाबासाहेब आंबेडकर फाऊंडेशन या संस्थेचा पहिला वर्धापनदिन उत्साहात साजरा

डॉ.बाबासाहेब आंबेडकर फाऊडेशन (रजि.) या सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थेचा पहिला वर्धापनदिन सोहळा मोठ्या उत्साहात शहीद स्मारक सभागृह,

डॉ.बाबासाहेब आंबेडकर फाऊडेशन (रजि.) या सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थेचा पहिला वर्धापनदिन सोहळा मोठ्या उत्साहात शहीद स्मारक सभागृह, रमाबाई आंबेडकर नगर, घाटकोपर येथे साजरा करण्यात आला .
सदर कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष भारत वाघमारे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष नामदेव साबळे, जागतिक कीर्तीचे न्युरोसर्जन डॉ. विनायक जोशी, कोटक महिंद्रा बँकचे डायरेक्टर प्रथमेश काकरडे, प्रहार जनशक्ती पक्षाचे ऍड. अजय तपकीर , आंबेडकरी चळवळीच्या नेत्या उषाताई शेजवळ, शहीद स्मारक समितीचे अध्यक्ष अशोक हिरे, दलित पँथरचे सम्राट संगारे, महात्मा फुले समता परिषदेचे विनय गोरे आणि ज्येष्ठ पत्रकार आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार प्राप्त दिगंबर वानखेडे इत्यादी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
या कार्यक्रमाला मार्गदर्शन करताना सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात काम करताना संस्थांनी कोणती पथ्य पाळली पाहिजेत आणि कशा प्रकारे काम केले असता त्या यशस्वी होऊ शकतात या विषयावर भारत वाघमारे यांनी विशेष मार्गदर्शन केले तर नामदेव साबळे म्हणाले की जोपर्यंत आपल्या संस्था, संघटना आणि समाज आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होऊन सक्षम होत नाही तोपर्यंत आपली सार्वजनिक क्षेत्रातली लाचारी व दुर्बलता नष्ट होणार नाही आपल्याला स्वाभिमानाने जगता येणार नाही.
सदर संस्थेचे अध्यक्ष सुधीर कांबळे यांनी मार्गदर्शन करताना कार्यकर्त्यांना आदेश दिला की डॉ बाबासाहेब आंबेडकर फाऊडेशन ही संस्था संपूर्ण महाराष्ट्रात पसरली पाहिजे आणि सबंधित कार्यकर्त्यांनी समाज्याच्या अडचणी दुर केल्या पाहिजेत समाजाच्या सुखदुःखात सामील झाले पाहिजे.
तसेच या संघटनेच्या महाराष्ट्र राज्य महिला अध्यक्षा प्राध्यापक निशा आढाव यांनी आपल्या भाषणात महिलांना सामाजिक व शैक्षणिक कार्यात सहभागी होण्याचे आवाहन केले.
महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष नदीम सय्यद यांनी ही या कार्यक्रमात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमात वेगवेळ्या क्षेत्रात कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांचा संस्थेच्या वतीने प्रमाणपत्र व मानचिन्ह देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आले.
शेवटी भारत वाघमारे यांना बुध्द प्रतिमा असलेले चांदीचे नाणे आणि निशा आढाव यांना पैठणी साडी देऊन गौरवण्यात आले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सागर वाघमारे आणि सोनाली सुतार यांनी केले
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुरेखा जगधने,सोनाली सुतार, स्वप्नाली सुतार, पुष्पकांत सातपुते इत्यादी लोकांनी परिश्रम घेतले आणि कार्यक्रम यशस्वी केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button