महाराष्ट्र

कुलाबा मतदारसंघातून आदित्य माहीमकर निवडणुकीत उतरणार

आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये कुलाबा मतदारसंघातून आदित्य माहीमकर हे युवा तरुण निवडणुकीत उतरणार असल्याची माहिती

मुंबई /रविन्द्र भोजने: आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये कुलाबा मतदारसंघातून आदित्य माहीमकर हे युवा तरुण निवडणुकीत उतरणार असल्याची माहिती शनिवारी जीटी हॉस्पिटल सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ या ठिकाणी आयोजित कार्यक्रमात त्यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. जीटी हॉस्पिटल सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ तर्फे श्री गणेशाचे पाद्यपूजनाचे कार्यक्रमाचे आयोजन शनिवारी करण्यात आले होते त्यावेळी आदित्य माहीम कर त्या ठिकाणी आशीर्वाद घेण्यासाठी आले होते. कुलाबा मतदार संघातील शालेय शैक्षणिक सामाजिक समस्या सोडवण्यासाठी युवा नेतृत्व म्हणून आदित्य माहीमकर विभागातील नागरिकांच्या समस्या जाणून घेत आहेत आरोग्य पाणी यासारख्या नागरी समस्या ते जातीने सोडवीत असल्याचे आदित्य माहीमकर यांनी यावेळी पत्रकारांशी बोलताना सांगितले याप्रसंगी काँग्रेस चहा महिला नेत्या वैशालीताई गावडे व सामाजिक कार्यकर्ते भगवान कोळी हे देखील उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button