हिंदू हिताचे बोलणाऱ्यांना संपविण्याचे षडयंत्र आरक्षण न देणाऱ्यांवर जरांगे का बोलत नाहीत ? मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार ॲड आशिष शेलार
ज्यांनी मराठा समाजाला कधी आरक्षण दिले नाही, किंबहूना ज्यांनी मिळालेले आरक्षण घालवले, त्यांच्या विरोधात जरांगे पाटील कधीच चकार शब्द काढत नाहीत,
मुंबई: ज्यांनी मराठा समाजाला कधी आरक्षण दिले नाही, किंबहूना ज्यांनी मिळालेले आरक्षण घालवले, त्यांच्या विरोधात जरांगे पाटील कधीच चकार शब्द काढत नाहीत, उलट ज्यांनी दिले त्यांच्या विरोधातच जरांगे का बोलतात ? असा थेट सवाल मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार ॲड आशिष शेलार यांनी केला आहे. तसेच महाराष्ट्रात हिंदूंच्या बाजूने बोलणाऱ्या भाजपाला संपवण्याचे मोठे षडयंत्र रचले जातेय, असा गंभीर आरोपही त्यांनी केला.
मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार ॲड आशिष शेलार यांनी आज पत्रकारांशी संवाल साधला त्यावेळी जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या टीकेबाबत विचारलेल्या प्रश्नावंर भूमिका मांडताना आमदार ॲड आशिष शेलार म्हणाले की, मराठा समाजाच्या मागणीला भारतीय जनता पक्षाचे संपूर्ण समर्थन असून किंबहुना मराठा समाजाला आरक्षणा देण्याची भूमिका विरोधी पक्षाने केवळ भाषणात मांडली त्याचं कायद्यात रूपांतर करण्याचं काम देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पक्षाने केलें. जरांगे पाटील यांना त्यांचा विसर का पडलाय? जरांगे पाटील जोपर्यंत समाजाच्या आरक्षणाच्या भूमिकेबद्दल बोलत आहेत, तोपर्यंत आम्ही त्यांच्याबरोबर आहोत, पण ज्या वेळेला ती मर्यादा सोडून ते राजकीय भाष्य करतायेत त्यावेळेला आम्हालाही मर्यादा सोडाव्या लागतील, असा थेट इशरा त्यांनी दिला आहे.
आमदार ॲड आशिष शेलार पुढे
म्हणाले की, आता जे स्पष्ट करू इच्छितो की, जरांगे पाटील हे या आंदोलनकर्त्यांच्या मागणीचा नेतृत्व करतात ते योग्यच, पण याचा अर्थ सकल मराठा समाज म्हणजे जरांगे पाटील आहेत असं मानण्याचे कारण नाही. म्हणून जरांगे पाटील म्हणजेच सगळे मराठा आणि सगळेच मराठा दावणीला बांधले जातील, हा जर त्यांचा समज झाला असेल तर तो त्यांनी दुर करावा, हे त्यांना नम्रपणे सांगतो असेही त्यांनी म्हटले आहे.
समजाच्या आरक्षणाची भूमिका ते मांडतायेत लोकशाहीमध्ये त्यांना अधिकार आहे, सरकार त्यांच्या सगळ्या मानलेल्या भूमिकेंवर सकारात्मक विचार करते आहे, पण प्रश्न उपस्थित राहतो की, ज्यांनी आरक्षण दिले, टिकवले, त्याचे फायदे काही विद्यार्थ्यांना आणि युवकांना मिळाले, त्यांच्यावर ते टीका करतात आणि ज्यांनी आरक्षण दिलंच नाही त्यांच्याबद्दल एक चकार शब्द काढायला तयार नाहीत? अगदी स्पष्ट सांगायचं झालं तर मा. शरद पवार मुख्यमंत्री होते तेव्हा मराठा समाजाला आरक्षण मिळालं नाही, जरांगे पाटील साहेब आपण कधी त्यांच्यावर बोललात का? शरद पवारांच्या समर्थनाने उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री असताना या आरक्षणाचा निर्णय कोर्टात टिकला नाही, जरांगे पाटील साहेब आपण कधी उद्धवजींवर, शरद पवारांवर, नाना पटोले यांच्यावर कधी बोललात का?, टीका केलीत का? असा थेट सवाल आमदार ॲड आशिष शेलार यांनी केला आहे
तुम्ही टीका आणि आलोचनाने घालून पाडून कोणाला बोलताय? तर भारतीय जनता पक्षाला? देवेंद्र फडणवीस यांना? त्यांनी आरक्षण दिलं कायद्यात रूपांतरित केलं ते सर्वोच्च न्यायालय समोर टिकवलं, त्याचे फायदे आमच्या एका वर्गाला झाले त्यांच्यावर टीका करताय? मग तुम्ही कोणाच्या बाजूने आहात? आरक्षणाच्या जरी बाजूला आहात का? आरक्षणाच्या बाजूने प्रयत्न करणाऱ्यांच्या बाजूने आहात का? या भूमिका तुम्ही तपासून घ्या, असेही त्यांनी म्हटले आहे.
हिंदू हिताचे बोलणाऱ्यांना संपवण्याचे षडयंत्र
आम्ही गेल्या काही दिवसांपासून पाहतो एक सलगता एकरूपता दिसते आहे. आधी सुरु होते काँग्रेसच्या, राष्ट्रवादीच्या, उबाठा सेनेच्या नेत्यांच्या वक्तव्यामध्ये आणि तीच काही संस्था, संघटना, अर्बन नक्षल आणि काही आंदोलनकर्ते आणि आता जरांगे पाटील या सगळ्यांच्या बोलण्यात एक वाक्यता, एकरूपता दिसते आहे. ती म्हणजे भाजपला संपवा. प्रत्यक्ष मनोज जरांगे पाटील तर हे बोललेच, देवेंद्र फडणवीस यांना संपवा म्हणून. भाजपला संपवा याचा अर्थ महाराष्ट्रामध्ये हिंदू हिताची गोष्ट बोलणारा माणूस राहूच नये, हिंदुहितासाठी बोलणारा पक्ष वाचू नये, जेव्हा जेव्हा आम्ही हिंदू आहेत, महाराष्ट्राचे विकासाचं राजकारण याच्यावर बोलू याच्यासाठी काम करू, याच्या योजना करू, त्या भूमिका घेऊ, तेव्हा तेव्हा या आंदोलकांचे जे नेते हिंदूंना जाती-जातीमध्ये विभाजित करण्याचे काम करतात, मराठा समाज हे सुध्दा पाहतोय. हे एक मोठे षडयंत्र आहे, असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. म्हणून व्यापक हिंदुस्तान त्या ठिकाणी सुरुंग लावण्याचे काम जे जे कोणी करतात ते छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेल्या रस्त्यावरून भटकले तरंगे पाटील यांनी आत्मपरीक्षण करा, असा सल्लाही शेलार यांनी दिला आहे.
राजकीय भूमिका मांडल तर सडेतोड उत्तर देऊ
जरांगे पाटील भारतीय जनता पक्षाला संपवण्याची भूमिका ज्या ज्या लोकांनी घेतली, त्या लोकांच्या बद्दल थोडा अभ्यास करा, आम्ही समाजाबरोबरच आहोत, आणि समाज आमच्या बरोबर आहे, तुमच्या बरोबर सकल मराठा समाज आहे या गैरसमज राहू नका, आणि निवडणुकीची भाषा बोलत असाल तर आम्ही तयार आहोत. अशा आम्ही बऱ्याच निवडणुकांमध्ये पराभव ही पचवले आणि विजयी मिळवले. त्यामुळे त्यांनी निवडणुकीची भाषा आम्हाला शिकवू नये. तुम्ही जोपर्यंत समाजाची भूमिका मांडताय तिथपर्यंत तुमचं स्वागत आणि राजकीय भूमिका मांडल सडेतोड उत्तर देऊ, अशा शब्दात आमदार ॲड आशिष शेलार यांनी ठणकावले.