महाराष्ट्रमुंबई

मुंबई प्रेस क्लबच्या निवडणुकीत समर खडस यांच्या संपूर्ण पॅनलने बाजी मारली.

मुंबई प्रेस क्लबच्या यंदाच्या निवडणुकीत समर खडस यांचे संपूर्ण पॅनल विजयी झाले आहे. समर खडस यांची अध्यक्षपदी निवड झाली आहे. त्यांना 472 तर त्यांच्या प्रतिस्पर्धी अनिता शुक्ला यांना 181 मते मिळाली.

श्रीश उपाध्याय/मुंबई: मुंबई प्रेस क्लबच्या यंदाच्या निवडणुकीत समर खडस यांचे संपूर्ण पॅनल विजयी झाले आहे.
समर खडस यांची अध्यक्षपदी निवड झाली आहे. त्यांना 472 तर त्यांच्या प्रतिस्पर्धी अनिता शुक्ला यांना 181 मते मिळाली.

राजेश मस्करेन्हास यांची सभापतीपदासाठी विना आव्हान निवड झाली आहे.

रजनीश काकडे यांचीही उपाध्यक्षपदासाठी विना आव्हान निवड झाली आहे.

सचिवपदासाठी मयुरेश गणपट्टे यांची निवड करण्यात आली आहे. मयुरेश यांना 503 तर त्यांचे प्रतिस्पर्धी वसीम सय्यद यांना 150 मते मिळाली.
सहसचिवपदी आशिष राजे ४४१ मते घेऊन विजयी झाले आहेत. त्यांचे प्रतिस्पर्धी सुधाकर कश्यप यांना २०७ मते मिळाली.
कोषाध्यक्षपदासाठी सौरभ शर्मा यांनी बिन विरोध विजय मिळवला.

व्यवस्थापकीय समितीसाठी स्वाती देशपांडे (५४१ मते),
आदित्य दुबे (483 मते), अनुराग कांबळे (466 मते), रुचा कानोलकर (478 मते), गौरव लघाटे (411 मते), शशांक पराडे (456 मते), प्रवीण पाटील (488 मते), आशिष राणे (517 मते), लतिकेश शर्मा (422 मते), किरण उमरीगर (460 मते) निवडून आले आहेत.

व्यवस्थापकीय समितीच्या निवडणुकीत ब्रिजभान जैस्वार (२२८ मते), स्वप्नील शिंदे (२२४ मते), अनिता शुक्ला (२४० मते), संतोष तिवारी (२०५ मते) यांचा पराभव झाला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button