शेकडो लोकांशी फसवणूक करणाऱ्याला क्राइम ब्रांच ने केली अटक !
शेअर बाजारात गुंतवणूक करून मोठा नफा कमावण्याचे आमिष दाखवून लोकांची फसवणूक करणाऱ्या एका व्यक्तीला मुंबई गुन्हे शाखेच्या मालमत्ता कक्षाने अटक केली आहे.
शेअर बाजारात गुंतवणूक करून मोठा नफा कमावण्याचे आमिष दाखवून लोकांची फसवणूक करणाऱ्या एका व्यक्तीला मुंबई गुन्हे शाखेच्या मालमत्ता कक्षाने अटक केली आहे.
वर्सोवा परिसरात राहणाऱ्या आशिष दिनेश शहा याने शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याच्या नावाखाली शेकडो लोकांची फसवणूक केली. आशिष दोन महिन्यांपासून फरार होता. गुप्त माहिती आणि तंत्रज्ञानाच्या मदतीने मुंबई गुन्हे शाखेच्या मालमत्ता कक्षाने आशिषचा ठावठिकाणा शोधून त्याला मध्य प्रदेशातून अटक केली. मिळालेल्या माहितीनुसार, आशिषने सुमारे 500 लोकांची फसवणूक केली आहे. पोलिसांनी आशिषकडून 1900 ग्रॅम सोन्याची चेन आणि 25 लाखांची रोकडही जप्त केली आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
सह पोलीस आयुक्त (गुन्हे) लखमी गौतम, अतिरिक्त पोलीस आयुक्त शशीकुमार मीना, पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे, सहाय्यक पोलीस आयुक्त दत्तात्रय नाडे यांच्या सूचनेनुसार प्रॉपर्टी सेलचा प्रभारी पोलीस निरीक्षक मंगेश देसाई यांच्या पथकाने वरील कारवाई केली आहे.