मुंबई

वैद्यकीय महाविद्यालये राज्यात सुरु करण्याच्या बाबतीत भाजप प्रणित महाराष्ट्र सरकारचा निष्काळजीपणा: अध्यक्ष सुनिल गव्हाणे

दहा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांचा प्रस्ताव देऊन केवळ एका महाविद्यालयाला मिळवता आली परवानगी. राष्ट्रवादी विद्यार्थी सेल काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून सरकारचा निषेध.

सध्या सुरू होत असलेल्या नवीन शैक्षणिक वर्षासाठी १४ वैद्यकीय महाविद्यालयांचा प्रस्ताव महाराष्ट्र शासनाकडून राष्ट्रीय वैद्यकीय आयोग NMC(National Medical Commision) ला पाठवण्यात आला होता. मात्र सदरील प्रस्तावातून फक्त दोन वैद्यकीय महाविद्यालयांची निवड करून त्यांना ही फक्त प्रत्येकी पन्नास जागांना परवानगी देण्यात आली. सरकारी महाविद्यालयांच्या दहा प्रस्तावांपैकी, फक्त एका प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली, ज्यामध्ये फोर्ट परिसरातील गोकुळदास तेजपाल (GT) आणि कामा हॉस्पिटलच्या कॉमन कॅम्पसवर एक महाविद्यालय आहे. दुसरे एम.जी.एम इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ सायन्सच्या नेरुळमधील खाजगी मानीत विद्यापीठाच्या महाविद्यालयाला कार्य करण्यास परवानगी मिळाली.

याबाबत राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल गव्हाणे यांनी सांगीतले की शासनाने सादर केलेल्या दहा शासकिय महाविद्यालयांपैकी नऊ महाविद्यालयांमध्ये असलेल्या त्रुटी व सुविधांच्या कमतरतेमुळे ही परवानगी नाकारण्यात आली. महाविद्यालयात आवश्यक सोयी उपलब्ध करून देण्यात सरकार अपयशी ठरल्यानेच वैद्यकीय महाविद्यालयांना परवानगी मिळाली नाही. सरकार फक्त घोषणा आणि इव्हेंट करत असून लोकांच्या प्रश्नांच्या मुळाशी जाऊन काम करण्याची इच्छा सरकार मधील मंत्र्याकडे नाही. राज्यात लोकसंख्या निहाय डॉक्टरांचे प्रमाण वाढवणे व त्याचबरोबर आरोग्य सुविधा सुधारण्याची गरज असताना सरकार मात्र उदासीन आहे. अर्थसंकल्पात यासाठीचे आकडे फुगवले जात असताना दुसऱ्या बाजुला मात्र या वैद्यकीय महाविद्यालयात आणि संलग्न रुग्णालयात कर्मचारी, सोयी सुविधा आणि वैद्यकीय साधने सरकारला पुरवता आली नाहीत. यावर्षी नीट परीक्षेमध्ये घोटाळा झाला असल्याने या वर्षीचे वैद्यकीय प्रवेश अजूनही सुरू करण्यात आलेले नाहीत. त्यात भर म्हणुन नऊ शासकीय महाविद्यालयांना परवानगी घेण्यास सरकार अपयशी ठरल्याने या महाविद्यालयातून निर्माण होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या हक्काच्या अधिकच्या जागा देखील हातातून गेल्या आहेत.

जालना, भंडारा, गडचिरोली, नाशिक, अमरावती, अंबरनाथ, हिंगोली इत्यादी ठिकाणच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये आढळलेल्या त्रुटी लवकरात लवकर दूर करून राष्ट्रीय वैद्यकीय आयोग NMC(National Medical Commision) च्या निकषानुसार सर्व सुविधांची पूर्तता करण्याची आठवण करून देण्यासाठी विद्यार्थी संघटनेचे या जिल्हयातील आमचे पदाधिकारी घंटानाद आंदोलन करणार आहेत. याच शैक्षणिक वर्षात सदर वैद्यकीय महाविद्यालय सुरु करण्यासाठी शासनाने आतातरी कष्ट घ्यावेत अशी माहिती राष्ट्रवादी विद्यार्थी सेल काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष सुनिल गव्हाणे यांनी दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button