क्राईममहाराष्ट्रमुंबई
नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने 111 किलो गाज्यासह 4 आरोपींना केली अटक
नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो, मुंबईने एका आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश करून अहमदनगर येथून चार आरोपींना अटक करून त्यांच्याकडून 111 किलो गाझा जप्त केला आहे.
श्रीश उपाध्याय/मुंबई: नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो, मुंबईने एका आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश करून अहमदनगर येथून चार आरोपींना अटक करून त्यांच्याकडून 111 किलो गाझा जप्त केला आहे.
एका गुप्त माहितीच्या आधारे, एनसीबीने ओडिशातून गाझा आणणाऱ्या टोळीवर नजर ठेवली होती. टोळीतील सदस्य सतत त्यांचे लोकेशन आणि मोबाईल नंबर बदलत होते. त्यांच्या कार्यशैलीवर बारीक लक्ष ठेवून एनसीबी ने काल पाथर्डी, अहमदनगर येथून दोन वाहनांतून आणला जात असलेला 111 किलो गाझा पकडला. एनसीबीने एसएम मोरे, एल शेख, आर मोहिते आणि एस शेख याचार आरोपींना अटक केली आहे. एनसीबीने दिलेल्या माहितीनुसार, ओरिसा येथून गाझा आणून तो पुणे आणि मुंबईत विकला जाणार होता. एनसीबी या प्रकरणाचा तपास करत आहे.