महाराष्ट्रमुंबई

शेतकऱ्यांच्या समस्यावर तोडगा काढण्यासाठी शरद पवार साहेब यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार साहेब

बारामती: जानाई शिरसाई व पुरंदर उपसासिंचन योजना दुष्काळी भागाला न्याय देणाच्या दृष्टीने महत्वाच्या आहेत. या योजनांच्या मान्यता त्या काळी माझ्या सहीने झाल्या आहेत. आता या योजनांची दुरूस्ती आणि विस्तारिकण करण्याची गरज आहे. वीज बिलांचा विषय आहे. या धोरणात्मक गोष्टी राज्य सरकारच्या अधिपत्याखाली येतात. त्यावर ठोस उपायोजना करण्यासाठी मी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे. असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार साहेब यांनी बारामती येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार साहेब यांनी बारामती, पुरंदर, इंदापूर आणि भोरमध्ये विविध गावांना भेटी दिल्या. पुणे जिल्ह्यातील विविध गावांमधील अडचणी समजून घेतल्यानंतर शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिले आहे.

शरद पवार साहेब म्हणाले की, बऱ्याच गोष्टी लोकांनी सांगितल्या आहेत त्या बद्दल मी अधिकाऱ्यांशी बोलणार आहे. दुष्काळी भागाबाबत अनेक प्रश्न आहे. योजना झाल्या त्या माझ्या सहीने झाल्या होत्या. त्या बाबत काही धोरणात्मक निर्णय आहेत. त्यांनी बैठक घ्यावी अशी विनंती केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी बोलणार आहे. त्यातून काहीतरी अनकुल व्हावे असे मला वाटत असल्याचे शरद पवार साहेब यांनी बोलताना सांगितले आहे.

पुढे शरद पवार साहेब म्हणाले की, पाण्याचा प्रश्न जसा महत्त्वाचा आहे. तसाच शेतकऱ्यांसाठी जोडधंदा म्हणून दुधाचा धंदा महत्त्वाचा आहे. दुधाचा खर्च आणि त्याची मिळणारी किंमत याचा मेळ बसत नाही, असं सांगण्यात आलं आहे. दुधाचा दर ५ रुपये वाढवला जावा. सरकारनं अनुदान जाहीर केलं पण ते त्यांना मिळालं नाही. आजचा हा शेवटचा दिवस आहे. उद्या अधिकाऱ्यांची आणि परवा साहेबांची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक झाली की महाराष्ट्राच्या इतर जिल्ह्यात जाणार आहेत. संसदेचं सत्र आता सुरु होईल. ते संपलं की ज्या ज्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस आणि आमचे मित्र पक्ष ज्या ज्या ठिकाणी निवडणूक लढतील, तिथं जाऊन तिथल्या सहकाऱ्यांशी लोकांशी सुसंवाद साधावा हा माझा प्रयत्न राहील असेही पवार साहेब म्हणाले.

शरद पवार साहेब म्हणाले की, मराठा आणि ओबीसी समाजातील लोकांच्या ज्या मागण्या आहेत, त्यासंबंधी मार्ग काढायला केंद्र सरकारने पुढाकार घेण्याची गजर आहे. राज्य आणि केंद्र सरकारचे एका मर्यादेबाहेर आंदोलन जाणार नाही, याची काळजी घ्यावी. सामाजिक तणाव निर्माण होणार नाही, याची काळजी घेणे ही आपल्या सर्वांची जबाबादारी आहे. आम्ही इथे राजकारण आणू इच्छित नाही. पण इथे केंद्राला बघ्याची भूमिका घेऊन चालणार नाही. केंद्र सरकारने दोनही बाजूच्या प्रश्नात लक्ष घालून तोडगा काढायला हवा. या सगळ्याचं सोल्यूशन एकच आहे. ते म्हणजे केंद्र सरकारने याचा खुलासा घेतला पाहिजे. काही ठिकाणी कायद्यात बदल करावा लागेल. काही ठिकाणी केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या धोरणात बदल करावे लागतील, असे शरद पवार यांनी सांगितले आहे.

यावर सविस्तर बोलताना शरद पवार साहेब म्हणाले की, भाजप आणि मोदी सरकार यांच्या विश्वासाला जनतेमध्ये तडा बसला आहे. मोदीसाहेबची गॅरंटी राहिली नाही. लोकसभेच्या ४८ जागा होत्या, त्यापैकी आमच्या तीन पक्षाने ३०, ३१ जागा जिंकल्या. विधान सभेच्या मतदार संघांचा विचार केला, तर १५५ मतदार संघामध्ये आम्हा लोकांचा विजय झाला. २८८ जागेची विधान सभा त्यातील १५५ मतदार संघात विरोधकांना बहुमत मिळते. याचा अर्थ जनतेचा कल हा महाविकास आघाडीकडे आहे. त्या दुष्टीने आम्ही महाराष्ट्र जिंकण्यासाठी काळजीने पावले टाकणार आहे. असेही शरद पवार साहेब म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button