महाराष्ट्रसोलापूर

सोलापूर शहरामध्ये आंदोलन ताकदीने पार पडले

मुजोर नाना पटोले यांच्या पोस्टरला भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा व महिला मोर्चाच्या वतीने चिखल मारो आंदोलन.

सोलापुर: “मुर्दाबाद” “मुर्दाबाद” धिक्कार असो धिक्कार असो नाना पटोले यांचा अधिकार असो अशा घोषणांनी कन्ना चौक परिसर गेला दुमदुमून

काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी चिखलात पाय भरल्यानंतर सर्वसामान्य कार्यकर्त्यांकडून पाय धुवून घेतले सामान्य जनतेला गुलाम समजणाऱ्या प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा निषेध व्यक्त करण्यासाठी भारतीय जनता पार्टी व मोर्चा व महिला मोर्चाच्या वतीने कन्ना चौकात नाना पटोले यांच्या पोस्टरला चिखल मारो आंदोलन करण्यात आले यावेळी

भारतीय जनता पार्टी सोलापूर शहर अध्यक्ष नरेंद्र काळे, युवा मोर्चा अध्यक्ष डॉ किरण देशमुख महिला मोर्चा अध्यक्ष विजया वड्डेपल्ली, युवा मोर्चा सरचिटणीस रवि कोटमाळे, सिध्दार्थ मंजेली, माजी साभागृह नेता संजय कोळी, श्रीनिवास करली, वैभव हत्तुरे,राजु पाटील , दत्तु पोसा,अजित गायकवाड गौतम कसबे ,देविदास बनसोडे, शेखर फंड,समर्थ होटकर, श्रीपाद घोडके,माजी महापौर शोभा बनशेट्टी,श्रीकांचना यन्नम वंदना गायकवाड,स्वाती आवळे,विजयालक्ष्मी गड्डम,राधिका पोसा,विमल पुट्टा, राहुल घोडके, विशाल शिंदे, निलेश शिंदे, आनंद बिरू, नागेश सरगम, प्रतिक आडम, अमोल झाडगे,प्रवीण कांबळे, जगन्नाथ चव्हाण, संतोष बंडगर, शेखर ईराबत्ती, श्रीनिवास दायमा, चंद्रकांत तापडिया,विजय बंमगोडे,पवण आलुरे,यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button