महाराष्ट्रमुंबई

महाराष्ट्र विधान परिषदेच्या ११ जागांसाठी द्विवार्षिक निवडणूक कार्यक्रम जाही

भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी द्वैवार्षिक निवडणूक जाहीर केली आहे. महाराष्ट्र विधानसभा

भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी द्वैवार्षिक निवडणूक जाहीर केली आहे. महाराष्ट्र विधानसभा सदस्यांद्वारे निवडून दिल्या जाणाऱ्या विधान परिषदेच्या ११ सदस्यांचा कार्यकाळ २७ जुलै २०२४ रोजी संपणार आहे. या रिक्त होणाऱ्या जागांकरिता द्विवार्षिक निवडणूक होत असून यासाठी शुक्रवार, १२ जुलै २०२४ रोजी मतदान होणार आहे.

विधान परिषद सदस्य डॉ.मनीषा श्यामसुंदर कायंदे, विजय विठ्ठल गिरकर, अब्दुल्ला खान अ.लतीफ खान दुर्राणी, नीलय मधुकर नाईक, ॲड. अनिल दत्तात्रय परब, रमेश नारायण पाटील, रामराव बालाजीराव पाटील, डॉ.वजाहत मिर्झा अथर मिर्झा, डॉ.प्रज्ञा राजीव सातव, महादेव जगन्नाथ जानकर आणि जयंत प्रभाकर पाटील हे २७ जुलै २०२४ रोजी विधान परिषदेतून निवृत्त होत आहेत.

या निवडणुकीसाठी मंगळवार, 25 जून 2024 रोजी अधिसूचना जारी केली जाईल. मंगळवार, 2 जुलै, 2024 पर्यंत उमेदवारांना अर्ज दाखल करता येईल. उमेदवारांनी दाखल केलेल्या अर्जांची छाननी बुधवार, 3 जुलै, 2024 रोजी केली जाईल, तर उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत शुक्रवार, 5 जुलै, 2024 अशी आहे. शुक्रवार, 12 जुलै, 2024 रोजी सकाळी 9 ते दुपारी 4 या वेळेत या निवडणुकीसाठी मतदान होईल. तर त्याच दिवशी 5 वाजेनंतर मतमोजणी करण्यात येईल. ही संपूर्ण प्रक्रिया दिनांक 16 जुलै, 2024 पर्यंत पूर्ण होईल, असे भारत निवडणूक आयोगाने प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button