एकीकडे अपात्र असलेल्या कंपन्या दुसऱ्या निविदेत पात्र
महानगरपालिकेतील परिमंडळ 6 आणि 5 अंतर्गत 2023-24 आणि 2024-25 या वर्षासाठी खराब झालेले/कोसळलेले, मोठे आणि रस्त्याच्या कडेचे नाले/नाल्याच्या भिंर्तीच्या दुरुस्ती/पुनर्बाधणीच्या अप्रत्याशित कामांसाठी कंत्राटी एजन्सीच्या निविदेत एकप्रकारे चमत्कार झाला आहे.
मुंबई: महानगरपालिकेतील परिमंडळ 6 आणि 5 अंतर्गत 2023-24 आणि 2024-25 या वर्षासाठी खराब झालेले/कोसळलेले, मोठे आणि रस्त्याच्या कडेचे नाले/नाल्याच्या भिंर्तीच्या दुरुस्ती/पुनर्बाधणीच्या अप्रत्याशित कामांसाठी कंत्राटी एजन्सीच्या निविदेत एकप्रकारे चमत्कार झाला आहे. एकीकडे अपात्र असलेल्या कंपन्या दुसऱ्या निविदेत पात्र झाली असून याबाबत चौकशी करत पुन्हा योग्य निविदा जारी करण्याची मागणी आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी केली आहे.
आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी महापालिका आयुक्त तसेच अतिरिक्त आयुक्त प्रकल्प यांस पाठविलेल्या स्मरणपत्रात माहिती दिली आहे की महापालिकेने मागविलेल्या अलीकडील निविदासाठी ईएस 489 ज्यामध्ये 5 कंपन्यांनी भाग घेतला होता आणि व्यावसायिक अहवालात फक्त तीन कंपन्या पात्र आहेत. दोन कंपन्यांनी काही कारणास्तव अपात्र ठरवले गेले. तथापि, ज्या दोन कंपन्या वर्क कोड ईएस 489 साठी अपात्र ठरल्या आहेत त्या स्वस्तिक आणि हर्षिल नावाची कंपनी वर्क कोड ईएस 490 साठी पात्र आहेत त्यापैकी एक एल1 आहे. ईएस 489 आणि ई 490 चे व्यावसायिक अहवाल संशयाच्या नजरेने पाहिले जातात. परिमंडळ 6 अंतर्गत 7 टक्के कमी दराने तर परिमंडळ 5 अंतर्गत 18 टक्के कमी दराने काम दिले जाईल. आता 7 टक्के ऐवजी 13 टक्के कमी दराने काम करण्याची तयारी स्वस्तिक आणि हर्षिल कंपनीने दर्शवली आहे.
अनिल गलगली यांच्या मते यामुळे कामाची गुणवत्ता राखली जाईल का? हा मोठा प्रश्न आहे. एकाठिकाणी कंपनी अपात्र होते तर दुसरीकडे पात्र होते. याची चौकशी केल्यास संगनमत समोर येईल आणि 2 वर्षात काम व्यवस्थित होईल किंवा नाही? हे सांगणे सद्या तरी अशक्य आहे.