लाखोंची फसवणूक करणाऱ्या दोन वेटरला सायबर गुन्हे शाखेने केली अटक
बनावट कॉल करून लोकांची दिशाभूल करणाऱ्या दोन वेटर्सना सायबर सेल दक्षिण विभागाच्या पोलिसांनी अटक केली आहे.
बनावट कॉल करून लोकांची दिशाभूल करणाऱ्या दोन वेटर्सना सायबर सेल दक्षिण विभागाच्या पोलिसांनी अटक केली आहे.
मार्चच्या सुरुवातीच्या दिवसांत काही लोकांनी दक्षिण मुंबईतील एका रहिवाशाची पार्ट टाइम कामाचे आश्वासन देऊन 14.23 लाख रुपयांची फसवणूक केली.
या प्रकरणाचा तपास करत असताना सायबर सेलने नाशिक येथून हिमांशू मोरे आणि प्रेम शेवाळे यांना अटक केली आहे. आरोपी हॉटेलमध्ये वेटरचे काम करायचे आणि सहकाऱ्यांच्या नावे बनावट बँक खाती उघडून लोकांना गंडा घालायचे. पोलिसांनी त्यांच्याकडून 29 डेबिट कार्ड, 28 बँक खात्यांची पासबुक, 8 सिमकार्ड आणि 8 फोन जप्त केले आहेत. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
सह पोलीस आयुक्त (गुन्हे) लखमी गौतम, अतिरिक्त पोलीस आयुक्त शशीकुमार मीना, पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे, सहाय्यक पोलीस आयुक्त अबुराव सोनवणे यांच्या सूचनेनुसार दक्षिण विभाग सायबर सेल पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार काळे यांच्या पथकाने ही कारवाई केली.