क्राईमपुणेमहाराष्ट्र

पुणे लिंक रोडवर दोन लाख सत्तर हजारांच्या गंठनची जबरी चोरी

पुणे लिंक रोडवर दोन लाख सत्तर हजारांच्या गंठनची जबरी चोरी

कल्याण – पूणे लिंक रोड वरील चैतन्य हॉस्पिटल समोर भर रस्त्यात एका जेष्ठ महिलेल्या गळ्यातील दोन लाख सत्तर हजारांचे किमती गंठन हिसकावून नेण्याचा प्रकार गुरुवारी रात्री घडला आहे . भर रस्त्यात घडलेल्या या प्रकाराने परिसरात चिंतेचे वातावरण पसरले आहे .पोलिस सुत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार चैतन्य हॉस्पिटल समोरील विजय अपार्टमेंटच्या पहिल्या मजल्यावरील रुम नं १०१ मध्ये रहाणाऱ्या निता परशुराम निकम या ६० वर्षाच्या गृहीणी १ सप्टेंबरच्या रात्री ८ .१० वाजता काही पुणे लिंक रोड वरून कामानिमित्त इमारतीच्या समोरील चैतन्य हॉस्पिटल समोरून पायी जात असतांना त्यांच्या पाठीमागून दुचाकी वाहनांवरून दोन अनोळखी इसम आले व त्या पैकी मागे बसलेल्या इसमाने त्यांच्या गळ्यातील ९ तोळे वजनाचे आणि दोन लाख सत्तर हजार कीमतीचे गंठन जबरी खेचून घेऊन त्या ठिकाणाहून क्षणात पोबारा केला .या जबरी चोरीची तक्रार निता निकम यांनी कोळसेवाडी पोलिस ठाण्यात दाखल केली असून या घटनेचा तपास कोळसेवाडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक श्री . महेंद्र देशमुख यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरिक्षक श्री . दिनकर पगारे हे करीत आहे .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button